शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलायम माझे वडील, कधीच तुटणार नाहीत आमचे संबंध - अखिलेश

By admin | Updated: January 17, 2017 12:59 IST

समाजवादी पक्ष आणि आणि सायकल या निवडणूक चिन्हावरील हक्कावरून सुरू असलेल्या वादात बाजी मारल्यानंतर

ऑनलाइन लोकमतलखनौ, दि. 17 - समाजवादी पक्ष आणि आणि सायकल या निवडणूक चिन्हावरील हक्कावरून सुरू असलेल्या वादात बाजी मारल्यानंतर अखिलेश यादव यांनी मुलायम यांच्याशी आपला कधीच वाद नव्हता, असे म्हटले आहे. मुलायम सिंह यादव माझे वडील आहेत. त्यामुळे आमच्यातील संबंध कधीच तुटणार नाहीत, असे अखिलेश यादव यांनी आज सांगितले. तसेच काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू असून, त्याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. लखनौ येथील सरकारी निवासस्थानी पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अखिलेश यांनी मुलायम यांच्याशी आपले मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, " वडलांसोबतचे माझे संबंध कधीच तुटणार नाहीत, त्यांच्यासोबत माझे मतभेद कधीच नव्हते. पण काही कारणास्तव ही लढाई होणे आवश्यक होते." यावेळी समाजवादी पक्षाचे सायकल हे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळेल याची खात्री होती असेही अखिलेश यांनी सांगितले." माझ्याकडे आता मोठी जबाबदारी आली आहे. आता आमचे पूर्ण लक्ष उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा सरकार बनवण्यावर आहे, तसेच काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू असून येत्या एक दोन दिवसांत याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, " असे अखिलेश म्हणाले.