शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘माँ, मै फिदायीन मिशन पें हूं’

By admin | Updated: January 3, 2016 04:55 IST

पंजाबमध्ये पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानातून आलेले होते याचे स्पष्ट प्राथमिक संकेत या अतिरेक्यांपैकी एकाने केलेल्या फोनवरील

नवी दिल्ली / पठाणकोट : पंजाबमध्ये पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानातून आलेले होते याचे स्पष्ट प्राथमिक संकेत या अतिरेक्यांपैकी एकाने केलेल्या फोनवरील संभाषणावरून गुप्तचर संस्थांना मिळाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. एवढेच नव्हे, तर या अतिरेक्याने गुरुदासपूरच्या जिल्हा अधीक्षकांचे अपहरण केल्यानंतर त्यांच्याच मोबाइलवरून पाकिस्तानातील आपल्या आईला हा फोन केला असावा, असे दर्शविणारी माहितीही समोर आली आहे.सूत्रांनुसार, गुरुदासपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांचे शुक्रवारी त्यांच्या जीपसह अपहरण केले गेल्यानंतर दिल्लीतील गुप्तचर यंत्रणा सावध झाल्या होत्या व इतर अनेक गोष्टींबरोबर त्यांनी पठाणकोटमध्ये येणारे व तेथून बाहेर जाणारे फोन ‘ट्रॅक’ करण्यास सुरुवात केली. अशाच एका पठाणकोटच्या परिसरातून पाकिस्तानात केल्या गेलेल्या फोनवरील संभाषण ‘ट्रॅक’ केले गेले. हे संभाषण नंतर पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणाऱ्यांपैकी एक अतिरेकी व त्याची पाकिस्तानातील आई यांच्यातील आहे. यात हा अतिरेकी त्याच्या आईला, ‘माँ मैं फिदायीन मिशन पे हूं’, असे सांगत असल्याचे ऐकू येते. एवढेच नव्हे, तर पलीकडच्या बाजूने, आपला मुलगा कदाचित परत दिसणारही नाही याचे भान असूनही, आई या अतिरेक्याला ‘मिशन पे जाने के पहले पेटभर खाना खा लेना बेटा,’ असे सांगतानाही या संभाषणात ऐकू आल्याचे समजते.मात्र, आई व मुलगा यांच्यातील या संभाषणात दोघांनीही आपली ओळख उघड करण्याची गरज न पडल्याने हा अतिरेकी नेमका कोण? तो मारला गेला की अजूनही दडून राहिला आहे, या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळालेली नाहीत. अर्थात, संबंधित मोबाइल कंपनीकडून ‘कॉल रेकॉर्ड’ घेऊन त्याची छाननी केल्यावर, या संभाषणासाठी वापरला गेलेल्या मोबाइलचा सिम कार्ड नंबर काय? तो कोणाचा आहे व पाकिस्तानात कोणत्या मोबाइल क्रमांकावर फोन केला गेला होता, हा तपशील कालांतराने हाती येऊ शकेल.अधीक्षकांचा मोबाइल चोरलाअपहरण करून नंतर धावत्या जीपमधून बाहेर फेकून दिलेले पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांच्या पोलीस अंगरक्षकाने आणि जीपच्या चालकाने नंतर पोलीस ठाण्यात जाऊन जी माहिती दिली, त्यावरून अतिरेक्यांनी अधीक्षकांच्या चोरलेल्या मोबाइल फोनचा तर वापर केला नसावा ना? अशी शक्यताही दिसते.गेली पाच वर्षे अधीक्षक सलविंदर सिंग यांचे सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे कुलविंदर सिंग साहेबांचे जीपसह अपहरण केले गेले, तेव्हा त्यांच्यासोबत नव्हते. कुलविंदर यांनी पोलिसांना सांगितले की, एसपी साहेबांच्या अपहरणाची माहिती कळली, तेव्हा आम्ही त्यांच्या मोबाइलवर फोन करण्याचा प्रयत्न केला. पहाटे ३ वाजून २६ मिनिटांनी फोन लागला. मी ‘हॅलो’ म्हटल्यावर पलीकडच्या बाजूने ‘सलाम वालेकुम’ असे उत्तर आले. त्यावर मी ‘आप कौन?’ असे विचारल्यावर पलीकडच्या बाजूच्या व्यक्तीनेही मला ‘आप कौन?’ असे विचारले. हा आमच्या एसपी साहेबांचा नंबर आहे, असे सांगितल्यावर फोन घेणाऱ्याने ‘कौन एसपी साहब’ असे उलट विचारले. त्यानंतर मी बराच वेळ ‘हॅलो, हॅलो’ करत राहिलो, पण पलीकडून फोन बंद केला गेला.अधीक्षक सलविंदर सिंग यांचे ड्रायव्हर राजपाल सिंग यांनीही सांगितले की, ‘घडलेली घटना कळल्यावर मीही एसपी साहेबांच्या दोन्ही मोबाइल नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला, पण फोन लागला नाही.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)