अति महत्त्वाची बातमी-पैठण पाऊस
By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST
जोरदार पावसामुळे पैठणमध्ये दाणादाण
अति महत्त्वाची बातमी-पैठण पाऊस
जोरदार पावसामुळे पैठणमध्ये दाणादाण पैठण : पैठण तालुक्यात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली़ यामुळे शेतकर्यांची चांगलीच तारांबळ उडाली़ तहसीलच्या नोंदीनुसार काल पैठण २ मि. मी., ढोरकीन २ मि. मी., लोहगाव ३ मि.मी., पिंपळवाडी २ मि. मी. पाऊस झाला, तर विहामांडवा, पाचोड व दावरवाडी परिसरासह अनेक ठिकाणी तुरळक झाला़ या पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा ओला झाला़ याच प्रमाणे ज्वारीची सोंगणी झाल्यानंतर शेतात पडलेला कडबा ओला झाला़ आंब्याचा मोहरही या पावसामुळे बाधित झाला अशी माहिती इसारवाडीचे शेतकरी सुदाम बोबडे यांनी दिली़