शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन' दर्जा भारत काढून घेणार ?

By admin | Updated: September 27, 2016 13:30 IST

पाकिस्तानला देण्यात आलेल्या 'मोस्ट फेवर्ड नेशन' दर्जावर पुनर्विचार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 29 सप्टेंबरला बैठक बोलावली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - पाकिस्तानला दहशतवादी कारवायांपासून रोखण्यासाठी सिंधू नदीच्या पाण्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यानंतर भारत अजून एक पाऊल उचलण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला देण्यात आलेल्या  'मोस्ट फेवर्ड नेशन' दर्जावर पुनर्विचार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 29 सप्टेंबरला बैठक बोलावली आहे. बैठकीत परराष्ट्र मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 
सिंधू नदीच्या पाण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी बैठक बोलावली होती. १९६०मध्ये झालेला सिंधू नदी पाणीवाटप करार रद्द करणे शक्य नसले तरी भारताने स्वत:च्या वाट्याचे पाणी पूर्णपणे वापरून पाकिस्तानची कोंडी करावी, असा निर्णय या बैठकीत झाल्याचे सांगण्यात आले.
 
चिनाब नदीवर प्रस्तावित धरण बांधून, त्या पाण्याचा पाकिस्तानपेक्षा आपण अधिक वापर करावा, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे पडसाद उमटू शकतील. हे लक्षात घेत, मोदी यांनी रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, असे बैठकीत स्पष्ट केले. तुम्ही रक्त सांडू इच्छित असाल, तर तुम्हाला पाणी सहजासहजी मिळणार नाही, असेच त्यांनी जणू सूचित केले.
 
 
(व्यंगचित्रकार - संदीप प्रधान, असिस्टंट एडिटर, लोकमत)
 
जम्मू-काश्मीरचा ठराव
जम्मू आणि काश्मीरला पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्यामुळे हा करार रद्द करावा अशी मागणी करणारा ठराव राज्याच्या विधानसभेने एकमताने संमत केला होता. या ठरावानंतर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती अधिकारी आणि वेगवेगळ्या मंत्रालयांकडून मोदी यांनी मागितली आहे. त्यासाठी मोदी यांनी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, जलस्रोत सचिव शशी शेखर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समिती सदस्यांशी चर्चा केली.
 
पाण्याच्या अस्त्राला चीनमुळे अडचण
ब्रह्मपुत्रा नदीच्या भारतात जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद करण्याचाही पर्याय चीनकडे उपलब्ध आहे. ब्रह्मपुत्रा चीनमधून यार्लुंग झांगबो या नावाने वाहत बंगालच्या उपसागरात येऊन मिळते. या नदीच्या प्रवासात लक्षावधी भारतीय आणि बांगलादेशींचे पोषण होते. ब्रह्मपुत्रावर चीन ११ मोठी धरणे बांधत आहे त्यामुळे भारताच्या हितांना धक्का बसेल.
माजी परराष्ट्र मंत्री यशवंत सिन्हा यांच्यासह भाजपामधील आक्रमक नेत्यांची मागणी पाणी करार रद्द करावा अशी आहे तर तज्ज्ञांचे मात्र यावर एकमत नाही. १९६०मध्ये झालेल्या या करारानुसार पूर्वेकडील बियास, रावी आणि सतलज या नद्यांचे नियंत्रण भारताकडे दिले गेले आणि पश्चिमेकडील सिंधू, चिनाब व झेलम नद्यांचे नियंत्रण कोणत्याही बंधनाशिवाय पाकिस्तानकडे गेले.