शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पनामा प्रकरणात भारतातील आणखी दोन हजार नावे

By admin | Updated: May 11, 2016 03:17 IST

इंटरनॅशनल कंन्सोर्टियम आॅफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टसने पनामा पेपर प्रकरणात आणखी विस्तृत माहिती जाहीर केली आहे

नवी दिल्ली : इंटरनॅशनल कंन्सोर्टियम आॅफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टसने (आयसीआयजे) पनामा पेपर प्रकरणात आणखी विस्तृत माहिती जाहीर केली आहे. यात हजारो दस्तावेज असे आहेत, ज्यात भारताचे सुमारे दोन हजार नागरिक, कंपन्या आणि त्यांचे पत्ते यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. करचोरीचे सुरक्षित ठिकाण म्हणून पनामा पेपर उघड झाल्यानंतर यापूर्वी भारतातील काही नावे समोर आलेली आहेत. आयसीआयजेने जाहीर केलेल्या या माहितीत नेवादापासून हाँगकाँगपर्यंत व ब्रिटिश आइसलँडसह अन्य भागातील सुमारे २ लाख १४ हजार नावे वा कंपन्यांची नावे आहेत. ही माहिती पनामा पेपर प्रकरणाच्या चौकशीचाच एक भाग आहे. विदेशी कंपन्या आणि त्यातील नागरिक यांची जाहीर झालेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी माहिती आहे. यात कंपन्यांच्या मूळ मालकाचीही नावे आहेत. पनामाची कायदेविषयक संस्था मोसैक फोन्सेका यांनी म्हटले आहे की, एखाद्या देशातील माहितीचा दुसरा पैलूही असू शकतो. विदेशी कंपन्या आणि ट्रस्ट यांचा कायदेशीर वापरही होतो याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. संस्थेने आपल्या वेब पोर्टलवर म्हटले आहे की, आयसीआयजेच्या विदेशातील माहितीत ज्या नागरिकांची, कंपन्यांची नावे आली आहेत त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे, असे म्हणता येणार नाही. मागील महिन्यात पनामा प्रकरणातील नावे समोर आल्यानंतर ५००पेक्षा अधिक नावांवर तपास करण्यासाठी भारताने एका संस्थेची (एमएजी) स्थापना केली आहे. > काय आहे भारतातील माहिती? भारताशी संबंधित २२ कंपन्या वा अन्य संस्था, अधिकारी किंवा नागरिकांशी संबंधित १०४६ लिंक, ४२ प्रतिनिधी वा दलाल यासह देशातील ८२८ पत्ते (अ‍ॅड्रेस) यांचा या माहितीत समावेश आहे. यात दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईच्या उपनगरांसह हरियाणाच्या सिरसा, बिहारच्या मुजफ्फरपूर आणि मध्य प्रदेशच्या मंदसौर, भोपाळ येथील पत्त्यांचा समावेश आहे.