शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात दरदिवशी ५० पेक्षा जास्त मुलांचा कर्करोगाने मृत्यू

By admin | Updated: April 24, 2016 08:56 IST

भारतात दरदिवशी ५० पेक्षा जास्त मुलांचा कर्करोगाने मृत्यू होतो. ही मुले एक महिना ते १४ वर्ष वयोगटातील आहेत.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २४ - भारतात दरदिवशी ५० पेक्षा जास्त मुलांचा कर्करोगाने मृत्यू होतो. ही मुले एक महिना ते १४ वर्ष वयोगटातील आहेत. ग्लोबल ऑनकोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
 
कर्करोगाच्या उपाचाराचा महागडा खर्च आणि अत्याधुनिक उपचारांचा अभाव यामुळे कर्करोगाने भारतात लहान मुले दगावण्याचे प्रमाण जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विकसित देशांमध्ये कर्करोगांच्या उपचारांमध्ये प्रगती झाल्यामुळे तिथे ८० टक्क्यापेक्षा जास्त मुले कर्करोगामधून बरी होतात असे या अहवालात म्हटले आहे. 
 
आंतरराष्ट्रीय संस्थांमधील संशोधकांनी अभ्यास करुन हा अहवाल तयार केला आहे. यामध्ये टोरांटो विद्यापीठ, मुंबईचे टाटा मेमोरीयल सेंटरचा सहभाग होता. कर्करोग भारतात वेगाने फोफावत असून, लॅनसेटच्या २०१४ च्या अहवालानुसार भारतात दरवर्षी १० लाखापेक्षा जास्त कर्करोगाच्या नव्या रुग्णांवर उपचार होतात. 
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पुढच्या दशकभरात २०२५  पर्यंत भारतात कर्करोगग्रस्त रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढणार आहे. यामुळे कुटुंबांवरील आर्थिक खर्चाचा बोजा सुद्धा वाढणार आहे. आरोग्य मंत्रालयाने पुढच्या दहावर्षात कर्करोग, मधुमेह आणि ह्दयविकारामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी आरोग्य मंत्रालय विविध उपायोजना आखत आहे. 
 
कर्करोगामुळे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये सुधारणा,  पोषक आहार, प्रदूषण नियंत्रण तसेच लवकरात लवकर आजाराचे निदान आवश्यक आहे.