शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात आणखी ३,६०० जवान पाठविणार

By admin | Updated: April 17, 2016 03:10 IST

गेल्या चार दिवसांपासून जम्मू-काश्मिरात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे चिंतित केंद्र सरकारने खोऱ्यात निमलष्करी दलाचे अतिरिक्त ३,६०० जवान पाठविण्याचा निर्णय शनिवारी घेतला.

नवी दिल्ली: गेल्या चार दिवसांपासून जम्मू-काश्मिरात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे चिंतित केंद्र सरकारने खोऱ्यात निमलष्करी दलाचे अतिरिक्त ३,६०० जवान पाठविण्याचा निर्णय शनिवारी घेतला. तसेच यापुढे हिंसाचारात आणखी बळी जाऊ नयेत याची काळजी घेण्याची सूचना राज्य सरकारला केली. येथे आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर सखोल चर्चा करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त दल पाठविण्याचा निर्णय झाला. राज्यात मंगळवारपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात सुरक्षा दलाच्या कारवाईत पाच जण मृत्युमुखी पडल्यानंतर काश्मीरच्या काही भागात आज चौथ्या दिवशीही संचारबंदीसदृश निर्बंध कायम आहेत. गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार निमलष्करी दलाच्या १२ कंपन्या आज आणि २४ उद्यापर्यंत राज्यात डेरेदाखल होत आहेत. एका कंपनीत जवळपास १०० जवान असतात. परिस्थितीवर नजरगृह मंत्रालय जम्मू-काश्मीरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून परिस्थितीवर नजर ठेवून आहे. राज्यात सामान्य परिस्थिती निर्माण करण्याच्या दृष्टीने संपूर्ण सहकार्याचे आश्वासन केंद्राने दिले आहे. मोबाईल इंटरनेट सेवा बंदचकश्मीरच्या काही भागात चौथ्या दिवशीही संचारबंदीसदृश निर्बंध कायम असून संपूर्ण खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंदच ठेवण्यात आली आहे.पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कायदा व्यवस्था बिघडू नये यादृष्टीने कुपवाडा आणि हंदवाडासह उत्तर काश्मीरच्या काही भागात कडक निर्बंध लागू आहेत. खबरदारी म्हणून श्रीनगरच्या काही पोलीस ठाणे क्षेत्रातही निर्बंध कायम आहेत. पीडीपीचा आरोपकाश्मीरमध्ये अशांतता पसरली असताना काही स्वार्थी लोक हेतुपुरस्सर हिंसाचाराचा प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीने (पीडीपी) शनिवारी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)