शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींच्या हाय टेक स्वप्नात माकडांचे विघ्न

By admin | Updated: April 2, 2015 13:00 IST

वाराणसीला हायटेक शहर बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नात माकडांनी विघ्न आणले आहेत.

ऑनलाइन लोकमत 
वाराणसी, दि. २ -  भरघोस मताधिक्याने निवडून देणा-या वाराणसीला हायटेक शहर बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नात माकडांनी विघ्न आणले आहेत. गंगा नदीकिनारी टाकलेल्या फायबर ऑप्टिक केबल्स या माकडांनी तोडून टाकल्याने सरकारी यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. या समस्येवर तोडगा काढायचा कसा असा सवाल सरकारी अधिकारी उपस्थित करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी टेक्नोसेव्ही म्हणून प्रसिद्ध असून मोदींना देशभरात तंत्रज्ञान क्रांती घडवायची आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात मोदींनी वाराणसी या त्यांच्या मतदार संघातून केली आहे. वाराणसी हे धार्मिक शहर म्हणून या शहराला सुमारे ३ हजार वर्षांची परंपरा आहे. वाराणसीमध्ये अनेक मंदिरही आहेत. वाराणसीत देवदर्शन केल्यास मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. याशिवाय वाराणसीतील मंदिर परिसरात माकडांचा मुक्तसंचार असून भाविक या वानरांची पूजा अर्चाही करतात.  या सर्व गोष्टी आता मोदींच्या हायटेक स्वप्नात अडथळे आणत आहेत. शहरातील अनेक मंदिर असून या मंदिरांना अन्य ठिकाणी हलवणे अशक्य आहे. याशिवाय शहरातील माकडांचा मुक्तसंचारही सरकारी यंत्रणांसाठी तापदायक ठरत आहे. आम्ही केबल वायर टाकल्या की माकडं त्या वायरी तोडून देतात. दर दोन महिन्यांनी आम्हाला केबल वायर तुटल्याच्या तक्रारी येत असतात अशी माहिती वाराणसीची कम्यूनिकेशन इंजिनियर ए.पी. श्रीवास्तव यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. माकडांना पकडण्याचा प्रयत्न केला तर स्थानिकांच्या भावना दुखावतात अशी व्यथाही एका अधिका-याने बोलून दाखवली.
वाराणसीची लोकसंख्या २० लाखांहून अधिक असून शहरातील बांधकाम नियोजनबद्ध पद्धतीने झालेले नव्हते.  यामुळे शहरात जमिनीखालून केबल वायर टाकणे अशक्य आहे असे श्रीवास्तव यांनी नमूद केले. याशिवाय शहरात उन्हाळ्याच्या दिवसांत चार - चार तास वीज नसते. वीज नसल्याने सार्वजनिक ठिकाणी वाय फायची सुविधा देण्यात अडथळे येतात असा दावाही त्यांनी केला आहे.