शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या हायटेक स्वप्नात माकडांचे विघ्न

By admin | Updated: April 2, 2015 23:44 IST

भरघोस मताधिक्याने निवडून देणाऱ्या वाराणसी शहराला हायटेक करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे;

वाराणसी : भरघोस मताधिक्याने निवडून देणाऱ्या वाराणसी शहराला हायटेक करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे; पण या स्वप्नाच्या पूर्ततेत सध्या अनेक विघ्ने येत असून, सर्वात मोठा त्रास माकडांचा आहे. गंगा नदीकिनारी टाकलेल्या फायबर केबल माकडांनी तोडून टाकल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली असून, हा प्रश्न सोडवावा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. वाराणसी शहरातील अडचणी माकडांची अडचण तर आहेच, पण वाराणसी शहर हे गर्दीचे आहे. शहरात २० लाख लोक राहत असून, प्रत्येक विभागात खचाखच गर्दी आहे, त्यामुळे येथे अंडरग्राऊंड केबल टाकणेही कठीण जात आहे. मोदी यांची योजना भारतातील २ लाख ५० हजार खेडी परस्परांशी जोडण्यासाठी मोदी सरकारने तीन वर्षांच्या कालावधीत ७ लाख कि.मी. ब्रॉडबँड केबल टाकण्याचा निर्धार केला आहे. त्याचप्रमाणे २०२० पर्यंत १०० नवी स्मार्ट शहरे बांधली जाणार असून, या शहरांना इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरून शिक्षण व आरोग्य सुविधा देण्याचीही योजना आहे. या योजनेअंतर्गत विकसित केले जाणारे वाराणसी हे पहिले शहर असून, २५०० जागी ब्रॉडबँड केंद्रे सुरू केली जाणार आहेत.तसेच देशात अधिकाधिक लोकांकडे स्मार्टफोन यावेत अशीही योजना आहे. २०१७ पर्यंत भारतातील एक तृतीयांश लोकसंख्येकडे स्मार्ट फोन असतील, त्यांचा इंटरनेटशी संपर्क असेल असे मोदी सरकारचे स्वप्न आहे. इंटरनेटचा प्रसार होऊन ते अधिक स्वस्त झाल्यास भारताच्या जीडीपीत चार वर्षांच्या कालावधीत ७० अब्ज डॉलरची भर पडू शकते असे हे गणित आहे. पण भारतातील गर्दी व गोंधळ असणाऱ्या शहरांत तंत्रज्ञानाने शिस्त आणणे हे एक मोठे आव्हान आहे. (वृत्तसंस्था)