मोखाड्याच्या विवाहितेची आत्महत्त्या
By admin | Updated: July 12, 2015 23:56 IST
नाशिक : अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतलेल्या मोखाडा तालुक्यातील १९ वर्षीय विवाहितेचा शनिवारी (दि़११) जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या महिलेचे नाव पूजा विशाल वड असे असून, ती पुलाची वाडी येथील रहिवासी आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत पूजा वड हिने शनिवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले़ यामध्ये ती शंभर टक्के भाजल्याने तीस प्रथम मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने नवरा विशाल सोमनाथ वड याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रात्री दहा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला़ दरम्यान, या घटनेची मोखाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)