शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीने रोखला मोदींचा विजयी रथ

By admin | Updated: February 10, 2015 11:06 IST

दिमाखदार विजयानंतर नरेंद्र मोदी व भाजपाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १० - लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर हरियाणा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दिमाखदार विजयानंतर नरेंद्र मोदी व भाजपाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली आहे. दिल्लीत अवघ्या  तीन जागांवर भाजपा आघाडीवर असून ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवणेही भाजपासाठी कठीण झाले आहे. 
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळाल्यापासून भाजपाला देशभरात अच्छे दिन आले होते. २०१३ मध्ये झालेल्या दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले होते. या विजयामुळे देशभरात मोदी लहर असल्याचा दावा भाजपा नेते करत होते.  मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने एकहाती सत्ता काबीज करत काँग्रेसला नेस्तनाबूत केले.  लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्र व हरियाणा या राज्यांमधील विधानसभा निवडणूक पार पडल्या. यामध्येही भाजपाला बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपाच्या गोटात कमालीचा उत्साह संचारला होता. 
आगामी काळात बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा इच्छूक आहे. त्यादृष्टीने दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची होती. उत्तर भारतात दिल्ली हे छोटे राज्य असले तरी या राज्यात विजय मिळवणे भाजपासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दिल्लीत पाच प्रचार सभा घेतल्या. याशिवाय अमित शहा हेदेखील दिल्लीत जातीने लक्ष घालत होते. प्रचारासाठी केंद्रीय मंत्री व खासदारांची फौजही दिल्लीच्या मैदानात उतरवण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नकारात्मक प्रचार करण्यावर भाजपाने भर दिला. मोदी विरुद्ध केजरीवाल अशी थेट लढत टाळण्यासाठी भाजपा नेतृत्वाने किरण बेदी यांना दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषीत केले. स्थानिक नेत्यांना डावलून बेदींना पुढे करण्याचा अमित शहांचा डाव पूर्णपणे फसल्याचे निकालावरुन दिसत आहे. दिल्लीत भाजपाला ३४ जागा मिळतील असा अंदाज भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणात वर्तवण्यात आला होता. मात्र भाजपा आता फक्त ३ जागांवरच आघाडीवर आहे. यावरुन भाजपा दिल्लीतील सद्यस्थितीवरुन किती अनभिज्ञ होता हेच दिसते.