शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे पाकमध्ये स्वागतच - हाफीज सईद

By admin | Updated: July 14, 2014 18:35 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु असे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदने म्हटले आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १४ -  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु असे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदने म्हटले असून दहशतवादी कारवायांशी माझा संबंध नाही असा दावाही त्याने केला आहे. दरम्यान, वैदिकी यांनी हाफिज सईदच्या घेतलेल्या भेटीवरून प्रचंड वादळ उठले आहे. मुंबई बाँबस्फोटांचा सुत्रधार असल्याचा ठपका असलेल्या सईदला भारतीय सरकारच्या संमतीशिवाय थेट पाकिस्तानात जाऊन वैदिकी यांना भेट कशी घेता येते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून वैदिकी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विशेष म्हणजे मणीशंकर अय्यर प्रमुख असलेल्या शिष्टमंडळासोबत वैदिकी गेले होते, परंतु हे शिष्टमंडळ एका दिवसात भारतात परतले तर वैदिकी वैयक्तिक जबाबदारीवर काही आठवडे पाकिस्तानात राहिले व सईदला भेटले.
पाकिस्तानमध्ये जाऊन हाफीज सईदची भेट घेणारे वरिष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी भारतात परतल्यावर हाफीजशी झालेल्या चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. वैदिक म्हणाले, हाफीज सईदने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. तसेच त्याचा मोदींच्या पाकिस्तान दौ-यालाही विरोध नाही. लाहोरमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात हाफीज राहत असून त्याचे घर वर्दळीच्या ठिकाणीच आहे असे वैदिक सांगतात. हाफीजने वैदिक यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान मुंबईत फिरण्याची इच्छाही व्यक्त केली. माझे आई-वडिल पाकिस्तानमध्ये येण्यापूर्वी पंजाबमध्ये राहायचे अशी आठवण त्याने सांगितल्याचे वैदिक यांनी नमूद केले. भारतात आल्यावर मला माझी बाजू आणखी योग्य रितीने मांडता येईल असेही हाफीज स्पष्ट केले.
वैदिक हे योगगुरु रामदेव बाबा यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. वैदिक यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन हाफीज सईदची भेट घेतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पाक दौ-यावर मी पत्रकार या नात्याने गेलो होतो. पाकला जाताना हाफीज सईदशी मुलाखात होईल याची सूतराम कल्पना नव्हती. तिथे स्थानिक पत्रकाराने ही भेट घडवून आणल्याचा दावा वैदिक यांनी केला आहे. या दौ-यात वैदिक हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि अन्य नेत्यांचीही भेट घेतली.