शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

मोदी लाटेने मोडली पस्तीस वर्षांची परंपरा

By admin | Updated: May 17, 2014 00:17 IST

उस्मानाबाद : डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नावानेच उस्मानाबादची ओळख निर्माण झाली होती.

उस्मानाबाद : डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या नावानेच उस्मानाबादची ओळख निर्माण झाली होती. सहा वेळा विधानसभा आणि सरत्या लोकसभेत असे पस्तीस वर्षे उस्मानाबादचे प्रतिनिधीत्त्व करणार्‍या पाटील यांना या निवडणुकीत प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला आहे. वैयक्तिक जनसंपर्क आणि विकास कामांवर भर दिल्यानंतरही मोदी लाटेत राष्टÑवादी हक्काचा बालेकिल्ला राखू शकली नाही. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर १९५१ पासून डाव्या विचारसरणीचा पगडा आहे. १९५१ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली होती. हाच सिलसिला मागील अनेक वर्ष कायम होता. त्यानंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांचेच जिल्ह्यावर निर्विवाद वर्चस्व राहिले. मागील विधानसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव झाला. हे अपयशही राष्टÑवादीने गांभिर्याने घेतले होते. त्यानंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही मतदारसंघात दांडगा जनसंपर्क ठेवला होता. विशेष म्हणजे, शहर पाणी पुरवठा योजनेसह इतर विकास कामांतही त्यांचा लक्षवेधी सहभाग राहिल्याने याही निवडणुकीत डॉ. पाटील लोकसभेचा गड राखतील, असाच अंदाज प्रचाराच्या प्रारंभी वर्तविण्यात येत होता. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचाही राष्टÑवादीला फायदा होईल. तसेच भाजपाचे रोहन देशमुख यांची बंडखोरीही राष्टÑवादीच्या पथ्यावर पडेल, असा कयास लावला जात होता. मात्र, या दोन्ही मात्रा निवडणूक निकालानंतर कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, अंतिम टप्प्यात शिवसेनेतील नाराज पदाधिकार्‍यांची समजूत घालून त्यांना प्रचारात सक्रिय करण्यात सेना पदाधिकार्‍यांना यश आले. नेमके याउलट चित्र आघाडीमध्ये दिसून आले. प्रारंभी राष्टÑवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसणार्‍या काँग्रेसच्या काही नेत्यांनी शेवटच्या क्षणी विरोधकांशी हातमिळवणी केली. याचा मोठा फटका राष्टÑवादी काँग्रेसला सोसावा लागला. याबरोबरच जिल्ह्याबाहेरील असलेल्या औसा आणि बार्शी हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याने राष्टÑवादी पराभूत झाली.