शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची आश्वासने केवळ ‘हवाबाजी’

By admin | Updated: September 9, 2015 08:19 IST

मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ आणि निवडणूक जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे. वास्तविकतेचे भान नसलेल्या रालोआ सरकारने अपयश

नवी दिल्ली : मोदींनी निवडणूक प्रचाराच्या वेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ आणि निवडणूक जुमला असल्याचे सिद्ध झाले आहे. वास्तविकतेचे भान नसलेल्या रालोआ सरकारने अपयश झाकण्यासाठी केवळ सारवासारव चालविली आहे, या शब्दांत सोनिया गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारवर जोरदार प्रहार केला.राहुल गांधी यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मोहीम छेडल्यामुळेच भूसंपादन विधेयकाबाबत सरकारला माघार घेणे भाग पडले. त्याचे श्रेय पूर्णपणे कार्यकर्त्यांना देतानाच त्यांनी कामगार सुधारणा, महिला आणि बालकल्याण, माहिती अधिकार कायदा आणि मनरेगासारख्या योजनांसाठीही सरकारविरुद्ध अशाच पद्धतीचे आंदोलन पुकारण्याचे आवाहन केले. मोदींनी मीडिया इव्हेंटस्ला महत्त्व देत घोषणा दिल्या; मात्र त्यांना शब्द पाळता आलेला नाही. हेडलाईन्स देण्यावर जोर दिला, पण प्रत्यक्षात आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. गेल्या आठवड्यात दिल्लीत रा.स्व.संघ आणि संलग्न १५ संघटनांची बैठक झाली.दुष्काळ आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्षदेशाच्या विविध भागात दुष्काळाची स्थिती आहे. शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस किंवा पाऊसच नसल्यामुळे पिके नष्ट झाली आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील बनले आहे. कलबुर्गी, पानसरेंचा उल्लेखपुरोगामी विचारवंत आणि लेखकांना जीवानिशी संपवले जात आहे, असे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षपणे अलीकडेच हत्या झालेल्या डॉ. एम.एम. कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला.