शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये मोदींचे नाव, ‘गुगल’चा माफीनामा

By admin | Updated: June 4, 2015 08:41 IST

गुगल सर्चवर ‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर संभ्रम व गैरसमज

नवी दिल्ली : गुगल सर्चवर ‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर संभ्रम व गैरसमज निर्माण झाल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘गुगल’ने बुधवारी माफी मागितली आहे. हा संपूर्ण प्रकार अस्वस्थ करणारा आहे. हे आमच्या मतांचे प्रतिबिंब नाही. काही वेळा एखादी गोष्ट शोधताना समोर येणारी छायाचित्रे धक्कादायक असतात. यामुळे निर्माण झालेले गैरसमज व संभ्रमाबाबत आम्ही माफी मागतो. असे प्रकार घडू नये यासाठी आम्ही आमची यंत्रणा सुधारण्यासाठी सातत्याने काम करत आहोत, असे ‘गुगल’च्या प्रवक्त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे एका ब्रिटिश दैनिक व सदोष ‘मेटाडेटा’मुळे आली असे ‘गुगल’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणात छायाचित्रांचा ‘सर्च’ करताना येणारे ‘रिझल्ट्स’ मोदी यांच्या बाबतीतील अनेक बातम्यांमधून एकत्रित होत होते. यात मोदी यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय नेत्यांबाबत केलेल्या वक्तव्यांचा समावेश होता. या बातम्या मोदी यांना कुठल्याही गुन्हेगारी घटनांसोबत जोडत नाही आणि शब्द एकमेकांशी साधर्म्य साधत असल्यामुळे हे ‘रिझल्ट्स’ समोर आले असेदेखील ‘गुगल’तर्फे सांगण्यात आले.दरम्यान, दिवसभर ‘गुगल’वर ‘टॉप १० क्रिमिनल्स’ असे टाकल्यावर नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे येत होती. यामुळे मोदी समर्थक भडकले व ‘टिष्ट्वटर’सह ‘सोशल मीडिया’वर ‘गुगल’वर टीकेचा भडिमार सुरू झाला. ‘टिष्ट्वटर’वर हाच मुद्दा ‘ट्रेन्डिंग’ होता. त्यामुळे ‘गुगल’वर जाऊन या ‘क्रिमिनल्स’ची माहिती घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यात मोदींसमवेत अनेक भारतीयांची छायाचित्रे येत होती. पहिल्या १२ छायाचित्रांमध्येच मोदी यांचे छायाचित्र ३ वेळा आल्यामुळे मोदी समर्थकांची नाराजी वाढली.