शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा सफेद करण्यासाठी मोदींची फेअर अँड लव्हली योजना

By admin | Updated: March 2, 2016 17:56 IST

काळा पैसा सफेद करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारवर हल्ला चढवला.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. २ - निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी काळापैसा बाळगणा-यांना तुरुंगात टाकणार असे  सांगत होते मात्र आता त्यांनाच वाचवण्यासाठी ते  योजना घेऊन आले आहेत.काळा पैसा सफेद करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारवर हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी सरकारच्या मेक इन इंडिया योजनेसह एकूण मोदींच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. निवडणुकीत मोदींनी रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते पण कोणलाही रोजगार मिळालेला नाही. मनरेंगा इतकी वाईट योजना मी बघितलेली नाही असे नरेंद्र मोदी सांगतात पण अर्थमंत्री अरुण जेटली मला येऊन सांगतात मनरेगा इतकी चांगली योजना नाही. मग हीच बाब ते पंतप्रधानांना का सांगत नाहीत ? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला. पंतप्रधानांनी आमचे ऐकावे, आम्ही त्यांचे शत्रू नाहीत. आम्ही तुमचा व्देष करत नाही असे राहुल म्हणाले. मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्यावेळी मोदींना मुंबईत जाऊ नका अशी भारत सरकारने विनंती केली होती. मात्र त्यांनी आमचे  ऐकले का ? मोदी मुंबईत गेले आणि त्यामुळे कारवाईत अडथळे आले असा आरोप राहुल यांनी केला. मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी नागा करारावर स्वाक्षरी केली त्याची गृहमंत्र्यांनाही माहिती नव्हती असे राहुल म्हणाले. भाषणाच्या आघोत राहुल गांधी गांधींजी आमचे आहेत, सावरकर तुमचे यात चूक काय ? असे विधान केले. राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निशाण्यावर होते. आता मोदी त्यांना काय उत्तर देतात याची उत्सुक्ता आहे.

 

राहुल गांधी यांच्या भाषणातील मुद्दे

अरुण जेटली मला भेटले आणि सांगितले मनरेगा इतकी दुसरी कोणतीही चांगली योजना नाही, मग हेच ते पंतप्रधानांना का सांगत नाहीत ? मेक इन इंडिया सुरु केले पण किती लोकांना रोजगार मिळाला काळापैसा बाळगणा-यांना तुरुंगात टाकणार असल्याचे ते सांगत होते मात्र आता त्यांना वाचवण्याची योजना ते घेऊन आले आहेत निवडणुकीपूर्वी मोदी म्हणत होते डाळ ७० रुपये किलो आहे, किंमती कमी करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते पण आता डाळीची किंमत प्रतिकिलो २०० आहे  पाकिस्तानने मुबई हल्ला केला आणि आपल्या पंतप्रधानांनी काय केलं ? कोणताही विचार न करता पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चहा प्यायला गेले जेव्हा मुंबई हल्ला झाला सरकारने नरेंद्र मोदींना मुंबई दौरा न करण्याची विनंती केली होती, पण त्यांनी ऐकल नाही ध्वजाचा आदर म्हणजे प्रत्येक मताचा आदर करणे  पंतप्रधान कुणाचा सल्ला ऐकतात, कोणाच्या मताचा आदर करतात   हा देश म्हणजे पंतप्रधान नाही आणि पंतप्रधान म्हणजे हा देश नाही   न्यायालयात प्राध्यापक, विद्यार्थ्यांना मारले तेव्हा पंतप्रधान गप्प का बसले ?   तुम्ही जेएनयू आणि गरीबांना चिरडू शकत नाही  गांधीची आमचे आहेत, सावरकर तुमचे यात चूक काय काळा पैसा सफेद करण्यासाठी सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे