शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या स्थितीवर चर्चेस मोदी तयार : मुफ्ती

By admin | Updated: April 25, 2017 00:47 IST

खोऱ्यातील चिघळलेली परिस्थिती रोखण्यासाठी संबंधित गटांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारी दाखवली आहे,

नवी दिल्ली : खोऱ्यातील चिघळलेली परिस्थिती रोखण्यासाठी संबंधित गटांशी चर्चा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारी दाखवली आहे, असे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी म्हटले; मात्र चर्चेसाठी तसे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोदी यांची त्यांच्या येथील निवासस्थानी मुफ्ती यांनी २० मिनिटे भेट घेतल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘‘दगडफेक आणि गोळीबार होत असताना चर्चा घडू शकत नाही.’’ भेटीत मुफ्ती यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काश्मीर धोरणाचा उल्लेख केला. वाजपेयी यांच्या धोरणानुसार चर्चा जेथे थांबली होती तेथून ती परत सुरू केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. याचा अर्थ फुटीरवाद्यांशी चर्चा करा अशी त्यांची उघड सूचना आहे. खोऱ्यातील परिस्थिती सामान्य झाली की चर्चा करण्याचा मोदी यांचा हेतू आहे, असे त्यांनी सांगितले. चर्चा हाच एकमेवर पर्याय आहे. संघर्ष किती लांबवणार, असे मुफ्ती म्हणाल्या. वाजपेयी पंतप्रधान व लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान असताना हुरियत कॉन्फरन्सशी चर्चा झाली होती. ती चर्चा जेथे थांबली होती तेथून ती परत सुरू करण्याची गरज आम्हाला आहे, असे त्यांनी म्हटले. वाढत्या दगडफेकीबद्दल त्या म्हणाल्या की, काही तरुणांचा भ्रमनिरास झाला असून, काही तरुणांना दगडफेकीसाठी फेसबुक व व्हॉटस्अ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांतून चिथावणी दिली जात आहे.मुफ्ती यांनी खोऱ्यातील परिस्थिती येत्या दोन ते तीन महिन्यांत सुधारेल व त्यानंतर चर्चेसाठी पुढाकार घेतला जाईल, असे म्हटले. गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन त्यांनी खोऱ्यातील परिस्थितीवर चर्चा केली. येते दोन ते तीन महिने खूप महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. चर्चा कधी सुरू करायची याचा निर्णय केंद्रातील उच्च पातळीवरील नेते घेतील.