हरीश गुप्ता, नवी दिल्लीधर्मांतरणाचा वाद पेटला असतानाच रा.स्व.संघाचे पदाधिकारी आणि संलग्न संघटनांच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे नाराज होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनाम्याची धमकी दिल्याच्या वृत्तांचा पंतप्रधान कार्यालयाने(पीएमओ) स्पष्टपणे इन्कार केला आहे. मोदींनी धमकी दिलेली नाही किंवा राजीनाम्याचा त्यांचा उद्देशही नाही, असे उच्चपदस्थ सूत्रांनी लोकमतला सांगितले.काही वृत्तपत्रांनी (लोकमत नव्हे) दिलेले वृत्त निराधार असून केवळ कपोलकल्पित आहे. पंतप्रधान राजीनामा का देतील? असा सवाल करीत सूत्रांनी आश्चर्य व्यक्त केले. अशा घटकांना कसे हाताळायचे, हे मोदींना चांगले माहीत आहे. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रवीण तोगडिया आणि इतरांना हिंदुत्ववादाबद्दल चांगलीच समज दिली होती. भाजपचे काही नेते, खासदार आणि मंत्र्यांनीसुद्धा धर्मांतरणाबाबत वादग्रस्त विधाने केल्यामुळे मोदी कमालीचे संतप्त झाले आहेत. मोदींनी मंत्र्यांना समज दिली असून, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पक्षनेत्यांना व्हिप जारी करीत अशा विधानांना लगाम घालण्याचा आदेश दिला आहे.
मोदींनी राजीनाम्याची धमकी दिलेलीच नाही
By admin | Updated: December 22, 2014 03:03 IST