शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

संघाच्या अजेंड्याच्या दिशेने मोदी सरकारचे मार्गक्रमण

By admin | Updated: July 13, 2016 02:56 IST

रा.स्व. संघाच्या मूळ अजेंड्याच्या दिशेने हळूहळू का होईना, मोदी सरकारचे मार्गक्रमण सुरू झाले आहे. समान नागरी कायद्याबाबत देश लगेच सहमत होणार नसला

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीरा.स्व. संघाच्या मूळ अजेंड्याच्या दिशेने हळूहळू का होईना, मोदी सरकारचे मार्गक्रमण सुरू झाले आहे. समान नागरी कायद्याबाबत देश लगेच सहमत होणार नसला, तरी सरकारने या विषयाबाबत किमान दोन पावले पुढे टाकण्याचे धाडस दाखवले आहे. गोरक्षा व गोवंश संरक्षणाबाबतही सरकारची भूमिका संघाच्या विचारसरणीला पूरकच ठरली आहे. सुब्रमण्यम स्वामींचे स्वयंघोषित प्रयत्न वगळता, राम जन्मभूमीबाबत सरकारने सावध पवित्रा स्वीकारला आहे. अशा वादग्रस्त विषयांच्या निराकरणास थोडा वेळ लागतो, याची संघाला कल्पना आहे. राज्यघटनेतला अनुच्छेद ३७0 रद्द करण्याबाबत सरकार आणि संघाचा विचार तूर्त समान पातळीवर आहे. संघ आणि सरकारमध्येमतभेद असल्याची चर्चा अधूनमधून ऐकायला मिळते. तथापि, गेल्या २ वर्षांत संघ व सरकारच्या भूमिकेत टोकाचा संघर्ष उद्भवल्याची फारशी उदाहरणे नाहीत. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक फारसे सक्रिय नव्हते. बिहार निवडणुकीच्या ऐन तोंडावर सरसंघचालक मोहनराव भागवतांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वादग्रस्त विधानांचा दुष्परिणाम भाजपाला भोगावा लागला. थेट परदेशी गुंतवणूक, तसेच भू-संपादन विधेयकाबाबत सरकार आणि संघपरिवाराच्या भूमिकेत बरीच तफावत आहे, अशी उदाहरणे दिली जात असली, तरी सरकारच्या कामकाजात संघाने गैरवाजवी हस्तक्षेप केलेला नाही. अनेक मुद्द्यांबाबत सरकार आणि संघ यांच्यात तफावत असल्याचे चित्र जाणीवपूर्वक दाखवले जाते. कारण विरोधकांची स्पेस संघ भरून काढू इच्छितो. तथापि, आपला मूळ अजेंडा लागू करण्याच्या प्रयत्नात सरकार अडचणीत येऊ नये, या बाबतीत संघ कमालीचा दक्ष आहे. स्मृती इराणींचे मनुष्यबळ विकास खाते रा.स्व.संघाच्या सूचनेनुसार बदलण्यात आले, अशी चर्चा होत असली, तरी संघाशी सर्वाधिक जवळीक असलेल्या रामशंकर कथेरियांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र का मिळाला? असा प्रश्नही या निमित्ताने आपसूकच उपस्थित होतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)