शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

जाट आंदोलनाबाबत मोदी सरकारची कठोर भूमिका

By admin | Updated: March 19, 2016 01:43 IST

संपूर्ण देशाचे हरियाणातील जाट आंदोलनाकडे लक्ष लागले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनाविरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळेच आंदोलक नेत्यांनी आंदोलन दोन

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

संपूर्ण देशाचे हरियाणातील जाट आंदोलनाकडे लक्ष लागले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनाविरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळेच आंदोलक नेत्यांनी आंदोलन दोन आठवडे लांबणीवर टाकले आहे. प्रदेश भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरुद्ध धुसफूस चालविली असताना मोदींनी त्यांना अभय दिले आहे.महाराष्ट्रातील मराठा, गुजरातमधील पटेल, राजस्थानातील गुज्जर, तसेच उत्तर प्रदेशातील जाट समुदायानेही आपापल्या राज्यांमध्ये आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. संपुआ सरकारने जाटांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारले होते, त्यामुळेच हरियाणातील आंदोलन हे मोदींसाठी कसोटीचे ठरणार आहे.हरियाणातील हिंसक आंदोलनात ३५ जण मृत्युमुखी पडले तसेच ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. आंदोलन चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा विरोधकांचा आरोप आहे. जाट आंदोलकांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलिसांची मोठ्या प्रमाणात तैनाती करीत चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यासाठी सज्जता केली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी विधिमंडळात आरक्षण विधेयक पारित करण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले आहे.हरियाणातील काँग्रेस सरकारने जाटांना दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले असले तरी भाजपने निवडणूक काळात आरक्षणाचे गाजर दाखविले होते; मात्र कायदेशीर अडथळे दूर करण्यासाठी काहीही केलेले नाही. आरक्षण देणे अशक्यच, केंद्राकडून संकेत.... - जाट नेत्यांनी आपल्याला हवे ते करावे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने(एनसीबीसी) अहवालातील शिफारशींवर फेरविचार केल्याखेरीज ते शक्य नाही, असे संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी गेल्याच आठवड्यात जाट नेत्यांना सुनावले होते. नव्याने सर्वेक्षण पार पाडल्यानंतरच आयोगाकडून शिफारशींचा फेरआढावा घेतला जाऊ शकतो.- केंद्रीय नोकऱ्यांमध्ये जाटांना केवळ एक टक्का सांकेतिक आरक्षण दिल्यास त्यांचे समाधान करता येईल, असे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी वीरेंद्रसिंग यांनी म्हटले असले तरी मोदींनी त्यावर विचार केलेला नाही.