शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार दिल्ली सरकारला निष्क्रिय करु पाहतेय - केजरीवाल

By admin | Updated: January 15, 2016 18:39 IST

मोदी सरकार विरोधात आज केजरीवाल यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. मोदी सरकार दिल्ली सरकारला निष्क्रिय करु पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १५ - मोदी सरकार विरोधात आज केजरीवाल यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. मोदी सरकार दिल्ली सरकारला निष्क्रिय करु पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम आदमी पार्टीला निष्क्रिय करण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न आहे, पण तो कधीच यशस्वी होऊ देणार नाही असेही ते म्हणाले. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळे पासून माझ्याविरोधात वेगवेगळे कट रचले जात आहेत, असे ते म्हणाले. दिल्लीत प्रदुषण कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑड-ईव्हन योजनेच्या समारोपाच्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. सरकार चालवण्यासाठी पारदर्शकता आणि खरेपणा ही माझी प्रमुख अस्त्रं असल्याचं त्यांनी सांगितले.केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अलिकडेच केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर छापा टाकला होता. त्या दिवसाला केजरीवाल यांनी काळा दिवस असे संबोधत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरुद्ध मोदी यांनी कारवाई करण्याची हिंमत दाखवावी असे म्हणत टीका केली.पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांकडून समजले की मनिष किंवा सतींदर यांच्यावर पुढील छापा पडणार आहे. त्यांच्याकडील अधिकाऱ्यांवर काहीतरी चूक करण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे, असा खळबळजनक आरोप केजरीवाल यांनी ट्विटद्वारे केला आहे. तसेच तुम्ही काहिही करा मोदीजी आमच्यासोबत सत्य आणि देव आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारे आम्हाला धोका पोचवू शकत नाही असे दुसऱ्या एका ट्विटद्वारे केजरीवालांनी म्हटले आहे.