शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ सार्वत्रिक करण्यास मोदी सरकार पुन्हा आग्रही

By admin | Updated: October 5, 2015 02:25 IST

पंतप्रधान कार्यालयाने पुढाकार घेतल्याने गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड व हरियाणा या भाजपाशासित राज्यांनी ‘आधार’चा वापर सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचे लाभ

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयाने पुढाकार घेतल्याने गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड व हरियाणा या भाजपाशासित राज्यांनी ‘आधार’चा वापर सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचे लाभ पुरविण्यासाठी करण्याची मुभा मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने ११ आॅगस्ट रोजी दिलेल्या अंतरिम आदेशाने ‘आधार’ कार्डाचा वापर स्वयंपाकाच्या गॅसचे व रॉकेलसह रेशनवरील वस्तूंच्या वितरणापुरताच करण्याचे निर्बंध घातले आहेत. मात्र आता पंतप्रधान कार्यालयाने सरकारी योजनांसाठी ‘आधार’चा सार्वत्रिक वापर करण्यासाठी पुन्हा पुढाकार घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशात सुधारणा करावी किंवा त्याविषयी खुलासा करावा, यासाठी नव्याने अर्ज करण्यात आले आहेत.भाजपाशासित राज्यांखेरीज रिझर्व्ह बँक, सेबी, इरडा आणि ‘प्रेडा’ या बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील नियामक संस्थांनीही हे अर्ज केले आहेत. या अर्जांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या मंगळवारी विचार होणे अपेक्षित आहे.मोदी यांच्यासाठी जनधन योजना, आधार आणि मोबाइल शासन या त्रिमूर्तीत ‘आधार’ला महत्त्वाचे स्थान आहे. सूत्रांनुसार अमेरिकेच्या दौऱ्यावरून बुधवारी परतल्यानंतर लगेचच मोदींनी एक बैठक घेऊन ‘आधार’साठी होत असलेल्या नोंदणी कामाचा आढावा घेतला. येत्या डिसेंबरपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकास ‘आधार कार्ड’ मिळावे यासाठी नोंदणी कामाला वेग देण्याचा आग्रह मोदींनी बैठकीला उपस्थित असलेल्या काही राज्यांच्या मुख्य सचिवांकडे धरला, असेही सूत्रांंनी सांगितले.सरकारी सूत्रांनुसार, दलालांना हद्दपार करून भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी ‘आधार’ हे महत्त्वाचे साधन आहे यावर आधीच्या संपुआ सरकारप्रमाणे आताच्या ‘रालोआ’ सरकारचाही ठाम विश्वास आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)