ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही गोष्टीला अशक्य मानत नाहीत असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. आज नवी दिल्ली येथे नरेंद्र मोदी यांच्या जिवनावरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामचं कौतुक केलं ते म्हणाले मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी जसे होते आजही तसेच आहेत. त्यांच्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी यांच्या परराष्ट्र नितीचेही कौतुक केले, ते म्हणाले की पंतप्रदानांच्या परराष्ट्र नितीची जगभऱ चर्चा आहे. भविष्यात मोदींच्या या नितीचा भारताला नक्कीच फायदा होईल. आपल्या एका चांगल्या व्यक्तीचे आत्मचरित्र वाचायला हवे त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळू शकते. नवी दिल्ली येथे झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक दिग्गज नेते अपस्थित होते.
मोदी कोणत्याही गोष्टीला अशक्य मानत नाहीत - मोहन भागवत
By admin | Updated: July 12, 2017 13:33 IST