अकोल्यात दोघांवर जमावाचा हल्ला
By admin | Updated: August 1, 2015 01:11 IST
- एकाचा मृत्यू : शहरात संचारबंदीसदृश्य स्थिती
अकोल्यात दोघांवर जमावाचा हल्ला
- एकाचा मृत्यू : शहरात संचारबंदीसदृश्य स्थितीअकोला : अकोला शहरातील गुलजारपुरा भागात दोन युवकांवर १0 ते १२ जणांनी शुक्रवारी रात्री अचानक हल्ला चढवला. त्यात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तणाव निर्माण होऊन, शहरात संचारबंदीसदृश्य स्थिती निर्माण झाली.प्राथमिक माहितीनुसार, गुलजारपुरा भागात दोन युवकांवर रात्री १0च्या सुमारास एका जमावाने हल्ला चढवला. दोघांच्या पोटात या जमावाने तलवारी भोसकल्या. त्यात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता दाखल करण्यापूर्वीच त्यातील एकाचा मृत्यू झाला. तर, दुसर्याची प्रकृती चिंताजनक आहे.वरिष्ठ अधिकार्यांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. खबरदारी म्हणून गुलजारपुर्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.