वाळुंज कुटुंबीयांवर अन्याय झाल्यास मनसे रस्त्यावर उतरेल : राज ठाकरे
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
वडगाव मावळ (जि. पुणे): मंगेश वाळुंज खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार व उर्वरित गुन्हेगारांनात्वरित अटक करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी सखोल तपास करावा. वाळुंज कुटुंबीयांवर अन्याय झाल्यास मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
वाळुंज कुटुंबीयांवर अन्याय झाल्यास मनसे रस्त्यावर उतरेल : राज ठाकरे
वडगाव मावळ (जि. पुणे): मंगेश वाळुंज खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार व उर्वरित गुन्हेगारांनात्वरित अटक करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिसांनी सखोल तपास करावा. वाळुंज कुटुंबीयांवर अन्याय झाल्यास मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. कामशेत येथे दि. ४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान सुरू असताना राजकीय वैमनस्यातून मनसे तालुकाध्यक्ष मंगेश ऊर्फ बंटी वाळुंज यांचा गोळी झाडून खून झाला. मंगेश यांचा भाऊ योगेश ऊर्फ सोनू वाळुंज, बहीण मीनाक्षी वाळुंज व रिना बरदाडे यांची घरी जाऊन बुधवारी सायंकाळी ठाकरे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. वाळुंज यांचा खून झाल्याने मनसे मावळ तालुका नेतृत्वात पोकळी निर्माण झाली असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यांच्या भेटीमुळे कामशेत शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक ढाकणे म्हणाले, 'वाळुंज कुटुंबीयांवर एकूण आठ गुन्हे दाखल असून, गुन्ातील मुख्य आरोपीची खात्री करून त्यांनाच अटक केली आहे. गुन्ात नसलेल्यांना अटक केली जाणार नाही.'वाळुंज यांच्या कुटुंबीयांनी, मुख्य सूत्रधार आरोपी राजाराम शिंदे, माऊली ऊर्फ बाळकृष्ण शिंदे, रोहिदास शिंदे , शंकर शिंदे , राजू शिंदे, अभिमन्यू शिंदे , बाळू शिंदे व ऋषीनाथ शिंदे या आरोपींना त्वरित अटक करावी. पोलिसांनी माऊली ऊर्फ बाळकृष्ण शिंदे याच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी गुन्ात नसलेल्या व्यक्तींना अटक केली आहे. आमच्यावर एकूण आठ खोटे गुन्हे दाखल करून आरोपी केले असून गुन्ात असलेल्या व्यक्तींना शिक्षा द्या. आमच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका आहे. खुनातील आरोपी मोकाट फिरत असून त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी केली.---