शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मनरेगा’च्या मजुरी वाटपातून राज्यांना वगळणार ?

By admin | Updated: January 7, 2015 23:59 IST

मजुरीचे वाटप राज्य सरकारांमार्फत न करता ती लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्याची योजना देशपातळीवर राबविण्याची केंद्र सरकार तयारी करीत असल्याचे समजते.

नवी दिल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील (मनरेगा) मजुरांना तत्परतेने मजुरी देता यावी यासाठी मजुरीचे वाटप राज्य सरकारांमार्फत न करता ती लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्याची योजना देशपातळीवर राबविण्याची केंद्र सरकार तयारी करीत असल्याचे समजते.स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या थेट बँक खात्यांमध्ये जमा करण्याच्या १ जानेवारीपासून सुरु झालेल्या योजनेच्या धर्तीवरच ‘मनरेगा’ची ही योजना असेल. सध्या ‘मनरेगा’ची मजुरी थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना १०० निवडक जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरु आहे. ती संपूर्ण देशात राबविणे शक्य व्हावे यासाठी या मजुरीच्या हस्तांतरणासाठी ‘राष्ट्रीय रोजगार हमी निधी’ नावाचा एक स्वतंत्र निधी राष्ट्रीय पातळीवर स्थापन करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.सूत्रांनुसार असा स्वतंत्र निधी स्थापन करायचा आणि त्याच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वितरण व्यवस्थापनासाठी एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेस नेमून तिच्यामार्फत मजुरी लाभार्थींच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करायची, अशी ही व्यवस्था असेल.सध्याच्या व्यवस्थेनुसार ‘मनरेगा’ कामाच्या खर्चात ६० टक्के भाग मजुरीचा व ४० टक्के कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनसामुग्रीचा असतो. मजुरीचा सर्व खर्च ( वर्षाला सुमारे ३६ हजार कोटी रु.) केंद्र सरकार करते. हे पैसे केंद्राकडून राज्यांना दिले जातात व राज्यांकडून प्रत्यक्षात ज्या संस्थेने काम काढले असेल तिला मजुरीची रक्कम दिली जाते. यात मजुरांच्या हातात प्रत्यक्षपणे मजुरीचे पैसे पडण्यास विलंब होते व कित्येकवेळा ते पैसे भलत्यांच्याच हाती पडतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)४केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सर्व संबंधितांचे विचार जाणून घेण्यासाठी तयार केलेल्या एका टिपणानुसार ‘राष्ट्रीय रोजगार हमी निधी’चे खाते एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेत उघडले जाऊ शकेल. त्या खात्यात केंद्र सरकार मजुरीपोटी वेळोवेळी पैसे जमा करीत राहील.४ ‘मनरेगा’ची कामे काढणाऱ्या ग्राम पंचायत, तालुका पंचायत किंवा जिल्हा परिषद यासारख्या संस्थेने झालेल्या कामांच्या मजुरीसाठी या खात्यावर लगेचच्या लगेच ‘पे आॅर्डर’ काढायची व नेमलेल्या बँकेने मजुरीची रक्कम लाभार्थी मजुरांच्या बँक खात्यात थेट जमा करायची, अशी ही व्यवस्था असेल.