शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

‘युती’ फुटीने आमदार धास्तावले

By admin | Updated: September 23, 2014 05:07 IST

आम्हाला युती हवी आहे, पण आमचे ऐकते कोण? नेते ठरवतील त्या निर्णयासोबत जाण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही,

यदु जोशी, मुंबई आम्हाला युती हवी आहे, पण आमचे ऐकते कोण? नेते ठरवतील त्या निर्णयासोबत जाण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा आणि शिवसेनेचे बहुसंख्य आमदार व्यक्त करीत आहेत. युती तुटली तर सत्ता येणे कठीण आहे, अशी बहुतेक आमदारांची भावना आहे. ‘युती हवी की, नको?’ असा थेट प्रश्न भाजपा आणि शिवसेनेच्याही आमदारांना सदर प्रतिनिधीने केला असता ९० टक्के आमदार म्हणाले, आमचे नाव देऊ नका; पण युती झालीच पाहिजे, असे आम्हाला वाटते. आता कुठे सत्ता मिळण्याची चिन्हे दिसत असताना आमचे नेते एकमेकांशी भांडत असल्याचे पाहून वाईट वाटते, असा सूर आमदारांनी लावला. जागावाटपाच्या वादामुळे आमदार हवालदिल झाले असून अनेकांनी ‘युती टिकवा’ असे एसएमएस नेत्यांना पाठविणे सुरू केले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना असे एसएमएस पाठविण्यात येत आहेत. भारतीय जनता पक्षाचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करीत असलेले शिवसेनेचे आमदार युती तुटण्याच्या भीतीने हैराण आहेत. हीच परिस्थिती शिवसेनेच्या प्रभावपट्ट्यातील भाजपा आमदारांची आहे. आम्ही मतदारसंघात फिरतो, लोक काय म्हणतात ते आम्ही सांगतोय, असा दावा त्यांनी केला. शिवसेनेचे एक आमदार म्हणाले, ‘तुम्ही पत्रकारांनी आमच्या नेत्यांना सांगितले पाहिजे; आम्हाला मर्यादा आहेत’. दुसऱ्या एका आमदाराने तर एसएमएसचा मजकूरच फॉर्वर्ड केला अन् म्हणाले ‘जरा आमच्या नेत्यांना फॉर्वर्ड करता का?’