शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मिरवाईज पाकिस्तानात चालायला लाग, गंभीर संतापला

By admin | Updated: June 19, 2017 22:33 IST

हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखने पाकिस्तान संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यानंतर भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्ताननं भारताचा 180 धावांनी लाजिरवाणा पराभव केला. त्यानंतर काश्मीरमधील हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखने पाकिस्तान संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यानंतर भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 
मिरवाईज उमर फारुख पाकिस्तानच्या विजयानंतर ट्विट करत म्हणाला, आजूबाजूच्या भागात फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. ईद जवळ आल्याचंच भासत आहे. चांगली खेळी केलेल्या संघानं विजय मिळवला. पाकिस्तान टीमचं अभिनंदन. मिरवाईज उमर फारुखच्या या ट्विटनंतर गंभीर प्रचंड संतापला. त्यानं मिरवाईज यालासुद्धा त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे.

गंभीर मिरवाईजला उद्देशून म्हणाला, माझा तुम्हाला एक सल्ला आहे. मिरवाईज तू नियंत्रण रेषा का ओलांडत नाहीस ? तुला तिथे चांगल्या प्रतीचे (चायनीज) फटाके सापडतील. ईद तिथेच साजरी केली जाते. मी तुझं सामान बांधून देईन. मिरवाईजच्या प्रकरणात गौतम "गंभीर" झाल्यामुळे या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरचं हे ट्विट जवळपास 10 हजारांपेक्षा अधिक युझर्सनं रिट्विट केलं आहे. या ट्विटरला 3 हजारांहून अधिक लोकांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या ट्विटमध्ये काहींनी गंभीरची बाजू घेतली आहे. तर काही युझर्सनं गंभीरवर टीका केली आहे. तसेच दोन हजारांहून अधिक लोकांनी ते ट्विट लाइक केले आहे.

मिरवाईजने याआधी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानी संघाने प्रवेश केल्यामुळे ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन केले होते. पाकिस्तानने इंग्लंडला पराभवाची धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश मिळवल्यावर मिरवाईजने पाकिस्तानचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.