शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत धावत्या गाडीमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By admin | Updated: December 11, 2015 15:52 IST

दिल्लीत धावत्या गाडीमध्ये सहा नराधमांनी मिळून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १० -  पश्चिम दिल्लीतील रानहोलामध्ये सहा नराधमांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन, तिच्यावर धावत्या गाडीमध्ये आळीपाळीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १४ वर्षांची ही पीडित तरुणी सातव्या इयत्तेत शिकत आहे. तरुणी सहा आरोपींमधील दोघाजणांना ओळखत होती. गुरुवारी ती त्यांच्यासोबत शाळेतून बाहेर पडली होती. अन्य आरोपी नंतर सहभागी झाले असे पोलिसांनी सांगितले. 

ज्या गाडीमध्ये बलात्कार झाला ती गाडी कॉलसेंटरची होती. आरोपींपैकी एक जण कॉलसेंटरमध्ये नोकरी करतो. दिल्लीच्या रस्त्यावरुन ही गाडी पळवत असताना, पोलिस नियंत्रण कक्षाच्या व्हॅनने या गाडीचा पाठलाग करुन मुलीची सुटका केली. पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, रमेश, नरेंद्र, राहुल, संदीप आणि सूरज अशी त्यांची नावे आहेत. 
या घटनेने पुन्हा एकदा निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करुन दिली. त्यावेळी आरोपींनी धावत्या बसमध्ये बलात्कार केला होता.