अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार आरोपी अटकेत, गोवंडीतली घटना
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार आरोपी अटकेत, गोवंडीतली घटना
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचारआरोपी अटकेत, गोवंडीतली घटनामुंबई: कारखान्यामध्ये झोपलेल्या अल्पवयीन कामगारावर मालकानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी रात्री गोवंडीत घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी नसीम खान(३८) नावाच्या आरोपीला अटक केली. अल्पवयीन कामगार मुळचा उत्तरप्रदेशचा. गोवंडीच्या बैगनवाडीतील एका कारखान्यात काम करतो. दिवसभर काम केल्यानंतर तो याच कारखान्यामध्ये झोपतो. गुरुवारी रात्री संधी साधत खानने या युवकाला ठार मारण्याची धमकी देत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. यानंतर जर हा कामगार कारखान्यात राहिला तर आपले बींग फुटेल या विचाराने खानने त्याला दुसर्याच दिवशी गावी धाडण्याची तयारी केली. मात्र ट्रेन सुटल्याने दोघेही कारखान्यात परतले. युवकाच्या अन्य सहकार्यांनी तडकाफडकी गावी जाण्याचे कारण त्याला विचारले. तेव्हा आदल्या रात्री घडला प्रकार त्याने सांगितला. हा प्रकार ऐकून सहकार्यांनी तात्काळ या मुलाला शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी शेख याला शुक्रवारी दुपारी अटक केली.