शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग मंत्रालयाचे ‘मेक इन पंजाब’

By admin | Updated: April 25, 2015 03:11 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जर्मनीचा दौरा करताना ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा दिला मात्र उद्योग मंत्रालयाने ‘मेक इन पंजाब’चा मंत्र स्वीकारला आहे.

संजय पाठक, नाशिकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जर्मनीचा दौरा करताना ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा दिला मात्र उद्योग मंत्रालयाने ‘मेक इन पंजाब’चा मंत्र स्वीकारला आहे. लुधियानातील दोन सायकल कंपन्यांशी ‘रेट कॉण्ट्रॅक्ट’ करून त्यांच्याकडूनच शासकीय खात्यांना सायकली खरेदीची सक्ती केली आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही विभागाने सायकली खरेदीसाठी निविदा मागविल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा इशाराच दिल्याने अन्य खात्यांचे अधिकारी संभ्रमात पडले आहेत.उद्योग मंत्रालयाने जानेवारीत सायकल खरेदीसाठी दोन रेट कॉण्ट्रॅक्ट केले. त्यानुसार लुधियाना येथील कोहिनूर सायकल्स प्रा. लि. आणि रवि इंडस्ट्रिज (हिप्पो सायकल) या दोन कंपन्यांशी उद्योग सहसंचालकांनीच हे करार केले आहेत. विशेष म्हणजे या कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा अनामत रक्कम घेण्यास मनाई आहेच; शिवाय कोणत्याही खात्याने सायकल खरेदीसाठी निविदा काढल्यास त्यांच्यावर गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.मुळातच रेट कॉण्ट्रॅक्ट हे आपत्कालीन परिस्थितीतच वापरण्याची बाब आहे. सायकल खरेदी ही आपत्कालीन शिर्षात कशी काय बसू शकते, हा प्रश्न आहे. ज्या वस्तूचे निश्चित दर नसतात अशा ठिकाणी रेट कॉण्ट्रॅक्ट सर्वाधिक उपयुक्त असते; परंतु सायकलींचे तसे नाही. त्यातच सायकल खरेदी करायच्या असतीलच तर महाराष्ट्रात सायकल उत्पादकांची कमी नाही. अशा स्थितीत उद्योग मंत्रालयाला लुधियानातील कारखानेच कसे काय दिसले, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, स्पर्धात्मक बोली आणि त्यातून होणारी आर्थिक बचत याचा विचार केला तर तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कामासाठी किंवा खरेदीसाठी ई-निविदा काढण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिलेले असताना, त्यांनाच रेट कॉण्ट्रॅक्टच्या माध्यमातून शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे.