शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्याच्या भावाच्या गॅस एजन्सीवर घातला छापा

By admin | Updated: January 16, 2017 05:01 IST

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भावाच्या गॅस एजन्सीवर छापा घालण्यात आल्याने खळबळ उडाली

नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भावाच्या गॅस एजन्सीवर छापा घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भेसळ आणि काळाबाजार याच्या तक्रारी आल्यानंतर ओडिशात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दक्षता शाखेने काही एजन्सींवर छापे घातले. यात प्रधान यांच्या भावाच्या एजन्सीचाही समावेश आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि डिझेल, पेट्रोलमध्ये भेसळीच्या तक्रारीनंतर कोरापूट, नवरंगपूर, पुरी, भुवनेश्वर, बरहामपूर, बलसोर, संबालपूर, बारगढ, अंगुल आणि कटक या ठिकाणी हे छापे घालण्यात आले. यातील एक एजन्सी केंद्रीय मंत्री प्रधान यांच्या भावाची आहे. अंगुल जिल्ह्यात तेलचर येथे ही गॅस एजन्सी आहे. दरम्यान, याबाबत संपर्कासाठी केंद्रीय मंत्री प्रधान हे उपलब्ध होऊ शकले नाहीत. भाजपचे प्रदेश महासचिव पृथ्वीराज हरिचंदन म्हणाले की, बिजू जनता दलाकडून कशा प्रकारे तपास एजन्सींचा चुकीचा वापर केला जात आहे ते यातून दिसते. स्थानिक पुरवठा विभाग आणि वजनमापे विभागाचे यासाठी सहाय्य घेण्यात आले. काही एजन्सींवर अनियमितता आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. काही ठिकाणी कमी अथवा अतिरिक्त साठाही आढळला. एका एजन्सीवर ग्राहकांना कमी प्रमाणात इंधन देत असल्याचे दिसून आले. तेलचरमध्ये एका ग्राहकाला कागदपत्रे नसतानाही गॅस सिलिंडर दिले जात असल्याचे दिसून आले. छापे घालणाऱ्या दक्षता पथकाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी कारवाईसाठी संपर्क केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेलचे नमुने घेण्यात आले असून तेथील व्यवस्थापक आणि सेल्समन यांच्या उपस्थितीत ते सिलबंद करण्यात आले. अनेक एजन्सींवर स्फोटक वस्तंूचा परवानाच नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत फिलिंग स्टेशन आणि त्यांच्या मालकांविरुद्ध कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.