स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने एक कोटींचा गंडा २३ जणांना फसवले : ऑनलाईन जाहिरातींचा वापर करुन मुंबईकरांनाही गंडवले
By admin | Updated: April 4, 2015 01:55 IST
येरवडा : अल्पदरामध्ये सदनिका देण्याची ऑनलाईन जाहीरात करुन २३ जणांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.
स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने एक कोटींचा गंडा २३ जणांना फसवले : ऑनलाईन जाहिरातींचा वापर करुन मुंबईकरांनाही गंडवले
येरवडा : अल्पदरामध्ये सदनिका देण्याची ऑनलाईन जाहीरात करुन २३ जणांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत. अंकुश बबन वडे (वय २९, रा.टेंभी, आग्रीवाडी, जि.पालघर मुळ रा. बोईसर वेस्ट, मुंबई, सध्या रा. चाकण), योगेश रघुनाथ कारंडे उर्फ युवराज राजाराम गडकरी उर्फ युसुफ मकलाई उर्फ नंदकुमार कुंबळे उर्फ राज चव्हाण (वय ३१, रा.ॲमेनोरा टाऊन सेंटर, हडपसर, पुणे, मूळ रा.पाटण, जि.सातारा) व आकाश उर्फ विक्रांत उमेश पाटील (वय २२, रा.महाराष्ट्र हौसिंग सोसायटी, येरवडा, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी नंदीनी रमेशकुमार ठाकुर गौतम (वय ३०, रा. एफ ४/१००८, आयव्ही वाईल अपार्टमेंट, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. नंदीनी या खराडीतील झेन्सार कंपनीत ज्येष्ठ संगणक अभियंता आहेत. या तिघांना ७ एप्रिलपर्यंत ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर स्वरुप शर्मा उर्फ राज शुक्ला उर्फ सुरज राकेश चोबे व रोहन पाटील हे दोघेजण अद्याप फरारी आहेत. आरोपींनी विमाननगरमधील लुंकड स्कायमॅक्स इमारतीमध्ये तसेच लष्कर परीसरातील क्लोअर सेंटरमध्येही दुकान भाड्याने घेतले होते. ऑलमॅक्स रियालिटी एक र्स व वेलींग्टन होम झोन इंडीया प्रा. लि. या कंपन्यांच्या नावाने स्वस्तामध्ये सदनिका देण्याच्या जाहीराती केल्या केल्या होत्या. मॅजीक ब्रिक्सच्या वेबसाईटवर या जाहीराती पाहून लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. विविध ठिकाणांवरच्या सदनिका दाखवून बिल्डर्सच्या दरापेक्षा कमी दरात सदनिका देण्याचे आमिष त्यांनी दाखवले. या आमिषाला भुललेल्या गुंतवणुकदारांनी पैसे भरले. काही दिवसातच कार्यालयांना टाळे ठोकून सर्वजण पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नंदीनी आणि अन्य गुंतवणूक दारांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करीत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून ४ दुचाकी,२ झेरॉक्स मशिन व १ संगणक असा एकुण ३ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय कुरुंदकर, पोलिस निरीक्षक विठ्ठल देवकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रताप कोलते, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, हवालदार उसुलकर, चंद्रकांत जाधव, नवनाथ वाळके, अविनाश संकपाळ, अमित जाधव, संतोष जगताप, हवालदार सोनवणे, लक्ष्मण नवघणे, पी.के.वाघोले यांनी तपास केला. चौकट मुंबई परिसरातही फसवणुक आरोपींनी नवी मुंबई, बांद्रा, मीरा रोड, नाला सोपारा, नेरुळ, वाशी, माणिकपुर, पालघर या परिसरातही अशाचप्रकारे नागरीकांची फसवणुक करुन सुमारे पावणेपाच कोटींचा गंडा घातलेला आहे. या प्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल असून ते फरारी दाखवण्यात आले आहेत. यातील अंकुश वडे हा वाणिज्य पदवीधर तर इतर आरोपी नववी-दहावीपर्यंत शिकलेले आहेत.