ऑनलाइन लोकमत
जयपूर दि. ०३ - दिल्ली, मुंबई पाठोपाठ पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणा-या जयपूर शहरातही आजपासून मेट्रो रेल्वे धावली.
जयपूरांचा प्रवास सुखद आणि वेगवान करणा-या या मेट्रो रेल्वेला आज मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी हिरवा कंदील दाखविला.
मेट्रो रेल्वे ही येथील मानसरोवर स्टेशन ते चापोळ स्टेशन दरम्यान धावणार आहे. तसेच या मेट्रोची १२३० प्रवाशी घेऊन जाण्याची क्षमता आहे.
भारतातील एक महत्वाची हायटेक मेट्रो म्हणून जयपूर मेट्रोला ओळखण्यात येणार आहे. दिल्ली, नोएडा, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरु या शहरानंतर आता मेट्रो सिटी म्हणून जयपूर सहाव्या क्रमांकावर आहे.