शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्याच्या किमती निश्चितीची पद्धत बदलणार

By admin | Updated: May 8, 2016 01:44 IST

अन्नधान्यांच्या किमती निश्चित करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी, अर्थ आणि धोरण केंद्र संचालकाच्या अध्यक्षतेत स्थापित समितीने

- प्रमोद गवळी,  नवी दिल्ली

अन्नधान्यांच्या किमती निश्चित करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी, अर्थ आणि धोरण केंद्र संचालकाच्या अध्यक्षतेत स्थापित समितीने एक अहवाल दिला असून, शिफारशींवर सरकार विचार करीत आहे.कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री मोहनभाई कुंदरिया यांनी राज्यसभेत काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, विद्यमान किमान आधारभूत मूल्य प्रणाली शेतकऱ्यांसाठी फारशी उपयुक्त राहिली नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे किमान आधारभूत मूल्य निर्धारणाच्या प्रक्रियात्मक पैलूंची तपासणी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. निती आयोगाने केलेल्या एका अध्ययनात असे निदर्शनास आले की, ७८ टक्के शेतकऱ्यांना सरकारद्वारे घोषित आधारभूत किमतींमुळे प्रोत्साहन मिळाले आहे. या शेतकऱ्यांना लाभकारी मूल्यांमुळे शेतीच्या अत्याधुनिक पद्धती अवलंबण्यासाठी अध्ययनाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले होते. यामध्ये उच्च दर्जाचे बियाणे, जैविक खत, रासायनिक खत, कीटकनाशके आणि पीक कापणीच्या अत्याधुनिक पद्धतींचा समावेश आहे. सरकार किमान आधारभूत मूल्यावर शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्पादन खरेदी करीत असते. शेतकरी आपले उत्पादन जेथे त्यांना अधिक लाभ मिळेल तेथे विकण्यास स्वतंत्र आहेत, असेही कुंदरिया म्हणाले.