शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वाडिया कुटुंबाला आलेल्या धमकीचा मेसेज इराणवरून

By admin | Updated: June 19, 2014 02:55 IST

उद्योगपती वाडिया कुटुंबीयांना आलेल्या धमकी प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी करत आहेत. ज्या फोनवरून एसएमएस आला तो इराणचा असावा

मुंबई : उद्योगपती वाडिया कुटुंबीयांना आलेल्या धमकी प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी करत आहेत. ज्या फोनवरून एसएमएस आला तो इराणचा असावा, असे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाल्याची माहितीही मारिया यांनी दिली. फोनवर संभाषण सुरू असताना वाडियांकडून ज्या कोणी हे फोन घेतले त्यांनी ते रेकॉर्ड केलेले नाहीत. जर हे संभाषण रेकॉर्ड केले असते तर कदाचित गुन्हे शाखेच्या दफ्तरी रेकॉर्ड असलेला रवी पुजारीचा आवाज आणि फोनवरून पुजारी अशी ओळख सांगून बोलणाऱ्याचा आवाज पडताळणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविता आला असता, असे एका अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. मात्र संभाषण रेकॉर्ड नसल्याने गुन्हे शाखेने याआधी रेकॉर्ड केलेले आवाज, संभाषण वाडिया कुटुंबीयांना ऐकविले जाण्याची शक्यता आहे. त्यातून कदाचित वाडिया कुटुंबीय फोनवरून धमक्या देणाऱ्याचा आवाज ओळखू शकतील आणि त्याची ओळख पटू शकेल.गुन्हे शाखेचे उपायुक्त आणि खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी संध्याकाळी वाडिया कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची सविस्तर तक्रार समजावून घेतली. फोन कधी आले, कोणाच्या मोबाइलवर आले, कोणत्या नंबरवरून आले, धमकी देणाऱ्याने स्वत:चे नाव काय सांगितले, तो पुढे काय बोलला हे सारे तपशील अधिकाऱ्यांनी समजावून घेतले. दरम्यान, नस्ली यांचे पुत्र नेस वाडिया यांच्याविरोधात प्रीती झिंटाने विनयभंगाची तक्रार केली. त्यावरून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी नेस यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला. या पार्श्वभूमीवर वाडिया यांना धमक्या देणाऱ्याने प्रीतीची बाजू घेतली. त्याने प्रीतीला आणखी छळलेत, तिला त्रास दिलात तर तुमचा उद्योग उद्ध्वस्त करू, ठार मारू, अशी धमकी वाडिया यांना दिल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत मारिया यांना विचारले असता त्यांनी माहिती देण्याचे टाळले.प्रीती आठवडाभरात परतणारआठवडाभरात मुुंबईला परतून पुरवणी जबाब देण्यास तयार असल्याचा निरोप प्रीतीने वकिलामार्फत दिल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. नेस वाडिया यांच्याविरोधात प्रीतीने दाखल केलेल्या तक्रारीचा तपास मरिन ड्राइव्ह पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)