शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मेघवाल यांना हाकला; मोदींवर वाढता दबाव

By admin | Updated: June 19, 2014 03:13 IST

बलात्काराचा आरोप असलेले केंद्रीय रासायनिक खत राज्यमंत्री निहालचंद मेघवाल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारवर दबाब वाढला आहे

जयशंकर गुप्त, नवी दिल्लीबलात्काराचा आरोप असलेले केंद्रीय रासायनिक खत राज्यमंत्री निहालचंद मेघवाल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारवर दबाब वाढला आहे. मेघवाल प्रकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारची कोंडी केली असताना केवळ न्यायालयाने समन्स बजावल्याने एखाद्याला गुन्हेगार ठरविणे योग्य नसल्याचे पक्षातील एका गटाचे म्हणणे आहे. मेघवाल यांना हटविल्यास विरोधकांपुढे नमते घेण्यासारखे होईल, अशी या गटाची भूमिका आहे. मेघवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली काँग्रेसच्या महिला आघाडीने भाजपा मुख्यालयावर मोर्चा काढला. दुसरीकडे पक्षाचे प्रवक्ते पी. सी. चाको यांनी सरकारवर हल्लाबोल केला. बलात्कारासारख्या घृणास्पद गुन्ह्यातील आरोपी आणि न्यायालयाने समन्स बजावलेली व्यक्ती सरकारमध्ये आहे, ही शरमेची बाब आहे, असे टीकास्त्र चाको यांनी सोडले. सरकार आता कायदेशीर प्रक्रियांचे पालन करीत असल्याचे सांगत आहे. हे अतीच झाले. अशा मंत्र्याला सरकारमध्ये एक क्षणही राहू देता कामा नये. सरकारने याप्रकरणात नैतिकतेच्या आधारे कारवाई करावी. राजकीय फायदा-तोट्याचे गणित पाहू नये, असा टोलाही चाको यांनी लगावला. काँग्रेसच्या महिला आघाडीप्रमुख शोभा ओझा यांनी मेघवाल यांच्यावरून मोदी यांच्यावर निशाना साधला. राजस्थानमधील पीडित महिलेला धमकवण्यात येत आहे. मेघवाल मंत्रिपदावर असेपर्यंत संबंधित महिला दडपणाखाली राहील, असे ओझा म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत कठोर कारवाईची भाषा करतात. पण सरकारमधील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणात आले. तेव्हा ना मेघवाल यांनी राजीनामा दिला. ना पंतप्रधानांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.