शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

MCD निवडणुकांच्या एक्झिट पोलमुळे आप चिंताक्रांत, केजरीवालांनी बोलावली बैठक

By admin | Updated: April 24, 2017 14:12 IST

दिल्लीत तीनही महापालिकेत भाजपाची तिसऱ्यांदा सत्ता येणार असल्याचा कालच एक्झिट पोलमधून अंदाज वर्तवला गेला आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 24 - दिल्लीत तीनही महापालिकेत भाजपाची तिसऱ्यांदा सत्ता येणार असल्याचा कालच एक्झिट पोलमधून अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे MCD निवडणुकीत पहिल्यांदाच नशीब आजमावत असलेल्या आम आदमी पार्टीची धाकधुकी वाढली आहे. दिल्ली महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून दाखवण्यात आल्यानं आपच्या पायाखालची जमीनच सरकत चालली आहे. एक्झिट पोलमुळे आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवालांच्या चिंतेत भर पडली आहे. दिल्लीतल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीचा पराभव झाल्यानं आपचा असंतोष उफाळून आला आहे. त्यामुळे केजरीवालांनी MCD निवडणुकीत विजय संपादन करण्याची रणनीती आखण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच आज सकाळी आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे काही सदस्य अरविंद केजरीवालांच्या घरी गेले होते. त्यामुळे दिल्लीत सध्या निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. दिल्ली महापालिका निवडणुकांमुळे आम आदमी पार्टीचं येत्या काळातील भवितव्यही स्पष्ट होणार आहे. आम आदमी पार्टीचं प्राबल्य असलेल्या राज्यांमध्येही दिल्ली महापालिका निवडणुकीचे पडसाद उमटण्याची भीती अरविंद केजरीवालांना सतावते आहे. पंजाबमधील आपच्या स्थानिक नेत्यांमधील असंतोषही बाहेर येऊ लागला आहे. त्यामुळे एकंदरीतच आम आदमी पार्टीच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

तत्पूर्वी एबीपी सीव्होटरच्या अंदाजानुसार, तीन महापालिकेतील 270 पैकी 218 जागांवर भाजपाला विजय मिळेल. आम आदमी पार्टीला 24 आणि काँग्रेसला 22 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. बीएसपीला केवळ 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. या एक्झिट पोलनुसार, भाजपाला 80 जागांचा फायदा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसला 55 आणि बीएसपीला 49 जागांचे नुकसान होत आहे. तसेच आज तक - एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार, भाजपाला 202 ते 220 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 19 ते 31 जागा आणि आम आदमी पार्टीला 23 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 8 ते 16 जागांवर अपक्ष आणि अन्य पक्षांचे उमेदवार विजयी होतील, असा कयास आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईव्हीएमच्या मशिनच्या गडबडीबाबत तक्रार केली आहे. मतदान अधिकाऱ्यांनी अनेक मतदारांना मतदान करू दिले नाही, असेही यात म्हटले आहे.