शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाने व्यापली भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

By admin | Updated: April 3, 2015 23:44 IST

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक प्रामुख्याने वादग्रस्त भूसंपादन विधेयकाभोवती फिरत राहिली. हे विधेयक शेतकरीविरोधी

बंगळुरू : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक प्रामुख्याने वादग्रस्त भूसंपादन विधेयकाभोवती फिरत राहिली. हे विधेयक शेतकरीविरोधी असल्याचा दिशाभूल करणारा प्रचार काँग्रेसने हेतुपुरस्सर चालविला आहे, अशी टीका करतानाच या पक्षाने भाजपमध्ये नसलेले दोष दाखविण्याऐवजी आपल्या नेत्याचा (राहुल गांधी) शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा टोला भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मारला. तर प्रस्तावित भूसंपादन विधेयकावर टीकेचा सामना करीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसभेला संबोधित करताना भू-लेखात(लँड रेकॉर्ड्स) सुधारणा करण्याची ग्वाही दिली. सरकार शेतकरी विरोधी नाही. तर विरोधक तसा खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.भाजप शेतकरी आणि शेतमजुरांच्या हितासाठी कटिबद्ध असून तळागाळातील कार्यकर्त्यांनी या विधेयकाच्या बाजूने भक्कमपणे उभे ठाकावे, असे आवाहन त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीचे उद्घाटन करताना केले. शेतकऱ्यांनीच भाजपाला जनादेश दिला आहे. भाजपा हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे आहे हा संदेश आम्ही त्यांच्याकडे पोहोचवू असेही शहा म्हणाले. काँग्रेस हतबल, निराश आणि दिशाहीन बनली असून या पक्षाने भाजपामध्ये अस्तित्वातच नसलेले दोष आणि त्रुटी शोधून काढण्याऐवजी आपल्या नेत्याचा शोध घ्यावा, असा उपरोधिक सल्ला देताना त्यांनी राहुल गांधी यांच्या अज्ञातवासातील सुटीकडे अंगुलीनिर्देश केला. या बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे १११ सदस्य, विशेष निमंत्रित, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. (वृत्तसंस्था)