शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

मादनाईक यांनी न केलेल्या कामाचे श्रेय लाटू नये

By admin | Updated: May 9, 2014 18:10 IST

* संभाजीपूरच्या सरपंचाचा इशाराजयसिंगपूर : जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अनिल मादनाईक हे संभाजीपूरसाठी ५ कोटी रूपये खर्चाची पाणी योजना मंजूर केली असल्याची चुकीची माहिती देवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. या योजनेला शिफारस देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या बैठकीमध्ये मंजूर होणार असून बैठक होण्यापूर्वीच केवळ श्रेयवादासाठी मादनाईक यांच्याकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप, ...


* संभाजीपूरच्या सरपंचाचा इशारा
जयसिंगपूर : जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अनिल मादनाईक हे संभाजीपूरसाठी ५ कोटी रूपये खर्चाची पाणी योजना मंजूर केली असल्याची चुकीची माहिती देवून जनतेची दिशाभूल करीत आहेत. या योजनेला शिफारस देण्याचे काम जिल्हा परिषदेच्या बैठकीमध्ये मंजूर होणार असून बैठक होण्यापूर्वीच केवळ श्रेयवादासाठी मादनाईक यांच्याकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप, सरपंच सौ. सविता पाटील-कोथळीकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
संभाजीपूरची पाणी योजना प्रति मानशी जवळपास चार हजार इतक्या खर्चाची असून या योजनेला अंतिम मंजूरी देणेचे काम राज्य शासनाच्या अखत्यारीत येते. जिल्हा परिषदेने केवळ शिफारस देणेचे असते असे असताना योजना आम्हीच मंजूर केली अशी माहिती जनतेला देणे चुकीचे आहे. ही योजना लवकरात लवकर मंजूर व्हावी यासाठी आ. डॉ. सा. रे. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर व संजय पाटील-यड्रावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून या पुढेही जिल्हा परिषदेच्या शिफारशीनंतर अंतिम मंजूरीसाठी शासनाकडे जाणार्‍या या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळवून देणेसाठी राज्याचे पाणी पुरवठा मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळे मादनाईक यांनी न केलेल्या कामाचा श्रेयवाद घेणे यापुढे बंद करावे, असा इशारा ही सरपंच कोथळीकर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
(प्रतिनिधी)