शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएस डॉक्टरांची होणार आता ‘एक्झिट एक्झाम’!

By admin | Updated: June 2, 2015 00:48 IST

एमबीबीएस डॉक्टरांना व्यवसायाचा परवाना आणि पदव्युत्तर शिक्षणास प्रवेश देण्यापूर्वी त्यांची देशपातळीवर एक स्वतंत्र परीक्षा (एक्झिट एक्झाम) घेण्याचा विचार आरोग्य मंत्रालय करीत आहे.

नवी दिल्ली : एमबीबीएस डॉक्टरांना व्यवसायाचा परवाना आणि पदव्युत्तर शिक्षणास प्रवेश देण्यापूर्वी त्यांची देशपातळीवर एक स्वतंत्र परीक्षा (एक्झिट एक्झाम) घेण्याचा विचार आरोग्य मंत्रालय करीत आहे.जे विद्यार्थी ही निर्णायक परीक्षा उत्तीर्ण करणार नाहीत त्यांना पदव्युत्तर शिक्षण घेता येणार नाही. शासकीय आणि खासगी वैद्यकीय या दोन्ही महाविद्यालयांमध्ये ही परीक्षा होईल. देशात दरवर्षी तयार होत असलेल्या डॉक्टरांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात येत आहे. प्रारंभी ही निर्णायक परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या डॉक्टरांसाठी एक स्वतंत्र अखिल भारतीय शाखा स्थापन करण्यात येईल. तूर्तास डॉक्टर मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) राज्य शाखेत नोंदणी करीत असतात. आणि दुसऱ्या राज्यात जायचे असल्यास हा परवाना स्थलांतरित केला जातो; परंतु यापुढे निर्णायक परीक्षा उत्तीर्ण करणारा डॉक्टर देशात कुठेही वैद्यक व्यवसाय करू शकेल.यासंदर्भात मंत्रालयाने तयार केलेल्या आराखड्यात विद्यमान विदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेच्या (एफएमजीसी) आधारे ही निर्णायक परीक्षा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इ. स. २००२ मध्ये एमसीआयने एफएमजीसीला छाननी परीक्षेसाठी मान्यता दिली होती. विदेशातून पदवी घेऊन भारतात व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना ही परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. आता सर्व एमबीबीएस डॉक्टरांसाठी ही परीक्षा घेण्याचा आरोग्य मंत्रालयाचा विचार आहे. विभागाच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सुरुवातीला डॉक्टरांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने ही परीक्षा सुरू केली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना एमसीआयअंतर्गत राष्ट्रीय नोंदणी क्रमांक मिळेल. या क्रमांकाच्या आधारे ते देशात कुठेही प्रॅक्टिस करू शकतील. शिवाय या व्यवस्थेमुळे सरकारला परीक्षेच्या निकालानुसार महाविद्यालयांचा दर्जा ठरविणेही सोपे जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)