शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

१० कोटींचा निधी परत मिळण्याचे संकेत महापौरांचे निवेदन : मुख्यमंत्र्यांचे सचिवांना निर्देेश

By admin | Updated: March 30, 2016 00:25 IST

जळगाव : महसूल विभागाने शासकीय करांच्या थकबाकी पोटी परस्पर वळता केलेला मनपाचा विकास कामांचा १० कोटी ६७ लाखांचा निधी परत मिळण्याचे संकेत आहेत. महापौर नितीन ल‹ा यांनी मुख्यमंत्र्यांची सोमवारी मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले असता त्यावर जिल्हाधिकार्‍यांना स्पष्ट निर्देश देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास सचिवांना दिल्या आहेत.

जळगाव : महसूल विभागाने शासकीय करांच्या थकबाकी पोटी परस्पर वळता केलेला मनपाचा विकास कामांचा १० कोटी ६७ लाखांचा निधी परत मिळण्याचे संकेत आहेत. महापौर नितीन ल‹ा यांनी मुख्यमंत्र्यांची सोमवारी मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले असता त्यावर जिल्हाधिकार्‍यांना स्पष्ट निर्देश देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास सचिवांना दिल्या आहेत.
मनपाकडे महाराष्ट्र शिक्षण कर व रोजगार हमी करापोटी १०कोटी ७० लाख ४१ हजार ११२ रुपयांची थकबाकी मनपाकडे दर्शवित तशी नोटीस तहसीलदारांनी बजावली होती. मात्र मनपाने २०१२-१३ ते फेब्रुवारी २०१६ अखेर मनपाने वसूल केलेली रक्कम वेळोवेळी शासकीय कोषागारात भरणा केली आहे. त्यामुळे मनपाकडे जेमतेम २ कोटीची थकबाकी आहे. त्यातच जिल्हाधिकार्‍यांकडील ९ मार्च २०१६ रोजीच्या पत्रानुसार मनपाला मुद्रांक शुल्काची प्राप्त १ कोटी ९२ लाखांची रक्कम महाराष्ट्र शिक्षण कर व रोहयो करापोटी शासकीय कोषागार यांच्याकडे वर्ग केली असल्याचे कळविले आहे. त्यामुळे मनपाकडे केवळ १६ लाख रुपयांची थकबाकी असताना मनपाला मूलभूत सुखसुविधा पुरविण्यासाठी प्राप्त ५ कोटी व रस्ता अनुदानासाठीची ३ कोटी ७५ लाखांची अशी ८ कोटी ७५ लाखांची रक्कम तहसीलदार यांच्याकडे परस्पर वर्ग करण्यात आली आहे. ती रक्कम परत विकास कामांसाठी मनपाच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी सोमवारी मुख्यमंत्र्यांकडे केली. या विषयावर आधीदेखील चर्चा झालेली असल्याने व त्याअनुषंगाने शासन आदेशही निघालेला असला तरीही त्यापूर्वी वळता केलेल्या निधीबाबत निर्देश नसल्याने मनपाची अडचण झाली असल्याचे ल‹ा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी उपमहापौर ललित कोल्हे हेदेखील सोबत उपस्थित होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास सचिवांना याबाबत जिल्हाधिकार्‍यांना स्पष्ट निर्देश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मनपाचा निधी परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
------
मनपाला अधिकारी देण्याची मागणी
महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे मनपाला अधिकारी देण्याची मागणीही केली. मनपा आयुक्तांचा तसेच उपायुक्तांचा कार्यकाळ संपत आलेला असल्याने त्यांची बदली झाल्यास तातडीने तेथे अन्य अधिकारी मिळावेत. तसेच एक उपायुक्तपद ८ महिन्यांपासून रिक्त आहे. १ सहायक आयुक्त, अप्पर आयुक्त, आरोग्याधिकारी, नगररचना सहायक संचालक पदी अधिकारी देण्याची मागणी केली.
-------
२५ कोटींचा निधीही मिळण्याची शक्यता
मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेला २५ कोटीचा निधी अद्याप मिळालेला नाही. त्याची फाईलही मार्गी लागली असून लवकरच हा निधी मनपाला प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.