शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

धोनीकडून मॅक्सवेलची तुलना सचिन, सेहवागशी

By admin | Updated: May 9, 2014 00:20 IST

पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेल याची तुलना माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याशी केली आहे़

कटक : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) मध्ये आतापर्यंत सर्वांत जास्त धावा करणार्‍या पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेल याची तुलना माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याशी केली आहे़ मॅक्सवेल याने आयपीएलमधील आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांत तब्बल ४३५ धावा कुटल्या आहेत़ बुधवारी झालेल्या सामन्यात मॅक्सवेलने ३८ चेंडूंत ९० धावांची खेळी केली होती़ धोनीने मॅक्सवेलच्या खेळीचे कौतुक केले़ तो पुढे म्हणाला, ‘‘मॅक्सवेलची खेळी आणि त्याची खेळपट्टीवर फलंदाजी करण्याची शैली खास आहे़ याच करणामुळे तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सेहवाग यांच्या पंक्तीत जाऊन बसतो़’’ धोनीने पुढे सांगितले, की पंजाबविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी आम्हाला चांगली सुरुवात करणे गरजेचे होते; मात्र तसे आम्ही करू शकलो नाही़ तसेच, ड्वेन स्मिथ आणि रवींद्र जडेजा हे लवकर बाद झाल्यामुळे संघ अडचणीत सापडला आणि आम्हाला पराभूत व्हावे लागले़ मात्र, असे असले तरी आम्ही पुढच्या लढतीत विजयपथावर परतू, असा विश्वास धोनीने व्यक्त केला़

माझ्या आणि गेलपेक्षा मॅक्सवेल धोकादायक -सेहवाग

किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने संघातील फलंदाज ग्लेन मॅक्सवेल माझ्या आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ख्रिस गेल यांच्यापेक्षाही धोकादायक आहे, असे म्हटले आहे़ यापुढेही तो गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरेल, असेही सेहवाग म्हणाला़ मॅक्सवेलने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात केवळ ३८ चेंडूंत ९० धावांची वादळी खेळी केली होती़ त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४३५ धावा केल्या आहेत़ सेहवागने पुढे सांगितले, की ग्लेन मॅक्सवेल याला रोखणे प्रतिस्पर्धी संघासमोर मोठे आव्हान आहे़ ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळ केला आहे, त्यावरून तो यापुढेही अशीच कामगिरी सुरू ठेवेल, असे चित्र आहे़ तसेच, युवा खेळाडू पंजाबचा संदीप शर्मा, चेन्नई सुपर किंग्जचा मोहित शर्मा आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सूर्यकुमार यादव यांनी आपल्याला आयपीएलमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करून प्रभावित केले आहे़ या खेळाडंूनी भविष्यात भारतीय संघात स्थान मिळविल्यास आश्चर्य वाटायला नको़ मॅक्सवेल मैदानात उतरला, की चौकार आणि षटकारांचा पाऊस सुरू होतो़ समोर गोलंदाज कोण आहे़, याची त्याला चिंता नसते़ केवळ प्रतिस्पर्धी गोलंदाजी फोडून काढणे हेच त्याचे लक्ष्य असते़ मात्र, त्याला आतापर्यंत शतक साजरे करता आलेले नाही़ पुढच्या सामन्यांत तो नक्कीच शतकी खेळी करेल. - वीरेंद्र सेहवाग,

किंग्ज इलेव्हन बेलीकडूनमॅक्सवेल, मिलरचे कौतुक

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) मधील सामन्यात शानदार विजय मिळवून देणार्‍या ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर यांचे किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार जॉर्ज बेली याने भरभरून कौतुक केले आहे़ आगामी सामन्यांतही हे खेळाडू आपल्या कामगिरीत सातत्य राखतील, असेही त्याने म्हटले आहे़ याच सामन्यात बेली याने केवळ १३ चेंडूंचा सामना करताना नाबाद ४० धावांची वेगवान खेळी केली होती़ याबद्दल तो म्हणाला, ‘‘मॅक्सवेल आणि मिलर यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली, ते बघून खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे, हे माहीत होते़ त्यामुळे खेळपट्टीवर उतरल्यानंतर नैसर्गिक खेळ केला़ त्यामुळे मी १३ चेंडूंत ४० धावा करू शकलो़’’ चेन्नईविरुद्ध लढतीत मॅक्सवेल आणि मिलर यांनी केलेल्या खेळाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे़ या खेळाडूंनी खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी आधी संथ सुरुवात केली आणि त्यानंतर वेगाने धावा काढल्या़’’ त्यांनी केलेली खेळी बघून युवा खेळाडू नक्कीच काहीतरी शिकतील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला़ - जॉर्ज बेली,

किंग्ज इलेव्हनचा कर्णधार मॅक्सवेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत अविस्मरणीय कामगिरी केली आहे़ विशेष म्हणजे पंजाब संघातील इतर खेळाडूही त्याची साथ देत आहेत. ही पंजाब संघाची जमेची बाजू आहे़

- महेंद्रसिंह धोनी, कर्णधार, चेन्नई सुपर किंग्ज