मुंबईतील तरुणीसोबत दिल्लीत सामूहिक अत्याचार
By admin | Updated: April 18, 2016 02:10 IST
नवी दिल्ली : मुंबईतील २६ वर्षीय तरुणीसोबत राजधानी दिल्लीमध्ये सामूहिक अत्याचाराची लाजिरवाणी घटना घडली.
मुंबईतील तरुणीसोबत दिल्लीत सामूहिक अत्याचार
नवी दिल्ली : मुंबईतील २६ वर्षीय तरुणीसोबत राजधानी दिल्लीमध्ये सामूहिक अत्याचाराची लाजिरवाणी घटना घडली. दिल्ली पोलीस विभागाने सांगितले की, राजधानीतील जुना राजेंद्रनगर भागात गुरुवार व शुक्रवारच्या रात्री ही घटना घडली. पीडित युवती विवाहाच्या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी आरोपीच्या फ्लॅटवर गेली होती. आरोपीने आपल्या एका मित्राच्या साथीने या तरुणीला दारू पाजली. त्यानंतर तिच्यासोबत सामूहिक अत्याचार केला. तरुणीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या तरुणीला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय चाचणीनंतर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली तर दुसरा आरोपी फरार आहे. राजेंद्रनगर पोलीस ठाण्यामध्ये सामूहिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी व आरोपी यांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम झाले. तरुणी गेल्या सात महिन्यांपासून मुंबई सोडून दिल्लीतील सफदरजंग भागात किरायाच्या घरात राहत आहे. (वृत्तसंस्था)