शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीशी लग्नाचा प्रयत्न फसला विवाहेच्छुक वधू-वर पोलिसांच्या ताब्यात : नाराज होऊन परतले वर्‍हाडी

By admin | Updated: January 5, 2016 00:27 IST

सेंट्रल डेस्क व हॅलो ग्रामीणसाठी

सेंट्रल डेस्क व हॅलो ग्रामीणसाठी

जळगाव- ३० वर्षाच्या मुलासोबत १५ वर्षांच्या मुलीचा विवाह होत असल्याचा एक निनावी फोन आल्यानंतर सोमवारी पोलिसांनी तानाजी मालुसरेनगरातील वडमायानजीक विवाह सोहळ्याचा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी विवाहेच्छुक वर आणि वधूस जबाब घेण्यासाठी शनिपेठ पोलिसात आणले. हे लग्न करू नका, अशी नोटीस वर आणि वधू पक्षाला बजावण्यात आली.

तानाजी मालुसरेनगरातील वडमायानजीक हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. किरण (नाव बदलले आहे) याचे लग्न चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी निश्चित झाले होते. सोमवारी दुपारी १२ वाजता लग्न सोहळा पार पडणार होता. त्यासाठी किरणच्या घरानजीक मंडप उभारण्यात आला.
रितीरिवाजानुसार हळदीचा कार्यक्रम झाला. तसेच वर आणि वधू पक्षाकडील सर्व पाहुणे मंडळी एकत्र आली. सोमवारी लग्नाची पूर्ण तयारी झाली.

सकाळीच पोलिसात निनावी फोन
हे लग्न होण्यापूर्वीच सकाळी १०.३० च्या सुमारास शनिपेठ पोलिसांना निनावी फोन आला. संबंधिताने आपले नाव सांगितले नाही, पण अल्पवयीन मुलीशी एका युवकाचे लग्न लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित व्यक्तीने पोलिसांना फोनवर सांगितले.

इऩ्फो-
वर्‍हाडींची पोलीस स्टेशनमध्ये गर्दी
फोनवरून मिळालेल्या माहितीनुसार शनिपेठ पोलीस ११ वाजेच्या सुमारास वडमायानजीक लग्न मंडपात पोहोचले. पोलीस उपनिरीक्षक पवन राठोड व इतर कर्मचार्‍यांनी प्राथमिक चौकशी केली नंतर वर आणि वधूस चौकशीसाठी ताब्यात घेतले व त्यांचे जबाब घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत वधूचे वय १५ वर्षे असल्याचे समोर आले. पण अधिकच्या चौकशीसाठी वधूच्या वयाचा दाखला व इतर कागदपत्रे पोलिसांनी मागविली. चौकशी होईपर्यंत लग्न होणार नाही, अशा आशयाची नोटीस दोन्ही पक्षांच्या मंडळीला बजावण्यात आली. वरास मंडपातून चौकशीसाठी नेल्यामुळे वर आणि वधू पक्षाकडील मंडळी शनिपेठ पोलिसात दाखल झाली. यामुळे पोलीस ठाणयात मोठी गर्दी झाली होती. लग्न सोहळा रद्द करावा लागल्याने वर्‍हाडींना गावी परतावे लागले.

इन्फो-
हलाखीची परिस्थिती
नियोजीत वधूची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तिला वडील नाहीत. आई मजुरी करून उदरनिर्वाह करते. तर वर किरण हादेखील मजुरी करतो,अशी माहिती मिळाली.

इन्फो-
आठवडाभरातील दुसरा प्रकार
अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा हा दुसरा प्रकार उघडकीस आला. पांझरापोळ भागात २ जानेवारी रोजी भुसावळच्या मुलासोबत लग्न होणार होते. याबाबतही पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्याने शनिपेठ पोलिसांनीविवाहरोखलाहोता.