शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर पर्रिकर होणार गोव्याचे मुख्यमंत्री ?

By admin | Updated: March 12, 2017 12:15 IST

केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा गोव्यात परतणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून लोकमतला मिळाली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा गोव्यात परतणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून लोकमतला मिळाली आहे. मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यास मगो, गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपासोबत येण्यास तयार झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात भाजपाचं निर्विवाद वर्चस्व होतं. मात्र पर्रिकर केंद्रात आल्यापासून गोवा भाजपाला कोणी वाली उरला नव्हता. गोव्यातील भाजपाचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांसह एकूण सहा मंत्र्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मंत्री महादेव नाईक, दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, आवेर्तान फुर्तादो, राजेंद्र आर्लेकर यांचा पराभव झाला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नसले तरी 40 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस 17 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष समोर आला आहे. त्यामुळे भाजपाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. भाजपाला 13 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर कधी नव्हे ते राष्ट्रवादीनंही 1 जागा पटकावत गोव्यात खातं उघडलं आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला 3 जागी विजय मिळाला आहे. तर गोवा फॉरवर्ड पार्टीनं 3 जागा जिंकल्या आहेत. इतर 3 जागा अपक्षांच्या पारड्यात गेल्या आहेत. विशेष म्हणजे वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे गोवा राज्यात सत्ता समीकरण जुळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असतानाच भाजपाकडून केंद्रातून मनोहर पर्रिकर यांना परत गोव्यात मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. (गोव्यात भाजपाला धक्का; काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष)मनोहर पर्रिकर सत्ता समीकरण जुळवून गोव्यातली सत्ता अबाधित राखतील, असा भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाला विश्वास आहे. तसेच गोवा विधानसभा निवडणुकीत पाच माजी मुख्यमंत्री विजयी झाले, तर तिघा अपक्षांनी बाजी मारली. गोव्यात भाजपाशिवाय पर्याय नाही, आम्ही महिलांसाठी प्रचंड योजना राबविल्या असून, गोव्याचा विकास केल्याचा दावा करणा-या भाजपाची 21 जागांवरून 13 जागांवर घसरगुंडी झाली. भाजपानं 23 ते 26 जागा जिंकण्याचा केलेला दावाही फोल ठरला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मतदारसंघात भाजपाने प्रचंड पैसा निवडणुकीवेळी खर्च केला. हाती पोलीस यंत्रणादेखील होती तरीसुद्धा मतदारांनी भाजपाला झिडकारून काँग्रेसला संधी देण्याचा विचार केला आहे. मात्र अद्यापही सत्ता समीकरणांचा तिढा कायम आहे. त्यामुळे पर्रिकर गोव्यात परतून भाजपाची सत्ता परत आणतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.