शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहनसिंग राष्ट्राला उद्देशून भाषण करणार नाहीत?

By admin | Updated: May 11, 2014 23:36 IST

तिसरी आघाडी स्थापन करून किंवा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा देऊन सरकारमध्ये कायम राहू, अशी आशा काँग्रेसला असली तरी सरकारी पातळीवर मात्र सामान आवरण्याची लगबग सुरू झाली आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
तिसरी आघाडी स्थापन करून किंवा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा देऊन सरकारमध्ये कायम राहू, अशी आशा काँग्रेसला असली तरी सरकारी पातळीवर मात्र सामान आवरण्याची लगबग सुरू झाली आहे. 
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी मी पुन्हा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसेन, असे आधीच स्पष्ट केले आहे. ते १७ मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते ७ रेसकोर्स हे पंतप्रधानांचे शासकीय निवासस्थान सोडणार आहेत. हे बघता अनेक मंत्र्यांनी आपल्या कार्यालयातील फाईल्सचा निपटारा केला आहे. 
राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारल्यानंतर डॉ. सिंग हे ३, मोतीलाल नेहरू मार्गावरील नवीन घरात राहायला जातील. डॉ. सिंग यांनी सलग दोनदा सरकारचे नेतृत्व केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर याआधी आलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्राला उद्देशून भाषण करणार होते. परंतु डॉ. सिंग यांना त्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे हे भाषण होण्याची शक्यता कमी आहे. परंतु पंतप्रधान डॉ. सिंग यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण करावे, असे पंतप्रधान कार्यालयाला वाटते. 
सिंग यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री फाईल्सचा निपटारा करीत आहेत. लोकसभा निवडणूक लढत नसलेले अर्थमंत्री पी. चिदंबरम हे देखील फाईल्सचा निपटारा करीत आहेत. नॉर्थ ब्लॉकमध्ये १८ मे रोजी औपचारिक हस्तांदोलन कार्यक्रम होईल. त्यानंतर चिदंबरम पुन्हा आपल्या वकिलीच्या व्यवसायात परततील. आंध्र प्रदेशातून आलेले केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांनी फाईल्सचा निपटारा करण्याचे आदेश आपल्या कर्मचार्‍यांना दिले आहेत. ते १७ मे रोजी राजधानीत परत येण्याची शक्यता आहे. ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी शुक्रवारी कृषी भवनातील आपली चेम्बर खाली केली. 
संपुआ-२ सरकारमधील काही मंत्र्यांनी शासकीय कार परत केली आहे; तसेच सामान आवरण्याची लगबग सुरू आहे. 
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पुढे येण्यास पी. चिदंबरम हे जबाबदार असल्याचा अनेक काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. चिदंबरम यांच्याकडील आयकर विभागाने नितीन गडकरी यांच्या परिसरात धाडी टाकल्या नसत्या, तर गडकरी यांची भाजपाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली असती. गडकरी यांच्या जाण्याने राजनाथसिंग आणि नरेंद्र मोदी यांना उभारी मिळाली.