शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहनसिंग म्हणाले होते, सहकार्य न केल्यास परिणाम भोगावे लागतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2015 23:56 IST

‘२ जी दूरसंचार लायसन्सेसप्रकरणी सहकार्य केले नाही तर परिणाम भोगावे लागतील,’ अशी धमकी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्याला दिली होती,

नवी दिल्ली : पूर्वाश्रमीच्या संपुआ सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे आणखी एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. ‘२ जी दूरसंचार लायसन्सेसप्रकरणी सहकार्य केले नाही तर परिणाम भोगावे लागतील,’ अशी धमकी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्याला दिली होती, असा खळबळजनक आरोप भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राई) माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी या पुस्तकात केला.बैजल हे स्वत: २ जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्यातील आरोपी आहेत. या प्रकरणात अरुण शौरी व रतन टाटा यांना गोवण्यात यावे, अशी सीबीआयची इच्छा होती, असेही बैजल यांनी स्वत: प्रकाशित केलेल्या आपल्या ‘द कम्प्लीट स्टोरी आॅफ इंडियन रिफॉर्म्स : २ जी, पॉवर अ‍ॅण्ड प्रायव्हेट एंटरप्रायज -ए प्रॅक्टिशनर्स डायरी’ या पुस्तकात म्हटले. २००३ मध्ये तत्कालीन रालोआ सरकारने बैजल यांची ट्राईच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती, हे विशेष.बैजल म्हणतात, ‘संपुआचे दूरसंचारमंत्री राहिलेले दयानिधी मारन यांच्या कार्यकाळापासूनच २ जी घोटाळ्याची सुरुवात झाली होती. जर मी सहकार्य केले नाही तर माझे नुकसान होईल, अशी सीबीआयने मला प्रत्येक बाबतीत धमकी दिली. योगायोग असा की अर्थतज्ज्ञ असलेल्या पंतप्रधानांनीही अशीच धमकी दिली होती, की जर मी २ जी प्रकरणी त्यांच्या योजनेप्रमाणे सहकार्य केले नाही तर मला परिणाम भोगावे लागतील.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)४माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि त्यांच्या सरकारच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारावर प्रकाश टाकणारे गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेले हे तिसरे पुस्तक आहे. याआधी मनमोहनसिंग यांचे सहकारी व मीडिया सल्लागार राहिलेले संजय बारू आणि माजी कोळसा सचिव पी. सी. पारेख या दोघांनीही आपल्या पुस्तकात मनमोहनसिंग यांच्यावर आरोप केले होते.४या संदर्भात डॉ. सिंग यांची प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही. पत्रकारांशी बोलताना बैजल म्हणाले, ‘मी सर्व काही सांगितले आहे. जे सांगितले ते शंभर टक्के सत्य असून ते सिद्ध करण्यासाठी मजजवळ पुरावेही आहेत.’