शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मनेका गांधी आणीबाणीबद्दल अनभिज्ञ नव्हत्या - आर. के. धवन

By admin | Updated: June 24, 2015 10:03 IST

मनेका गांधींना आणीबाणीविषयी सर्व माहिती होती व त्या प्रत्येक पावलावर त्यांचे पती संजय गांधी यांच्यासोबत होत्या, असा खुलासा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे खासगी सचिव आर. के.धवन यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि, २४ - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला या वर्षी चाळीस वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांचे खासगी सचिव आर. के. धवन यांनी आणीबाणीबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहे.  मनेका गांधींना आणीबाणीविषयी सर्व माहिती होती व त्या प्रत्येक पावलावर त्यांचे पती संजय गांधी यांच्यासोबत होत्या, असे आर. के. धवन यांनी म्हटले आहे. तसेच राजीव व सोनिया गांधी यांच्या मनात आणीबाणीविषयी कोणताही संदेह अथवा रुखरूख नव्हती असा खुलासाही धवन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 
इंदिरा गांधींनी लादलेल्या या आणीबाणीचा भारतीय जनता पक्षाने प्रखर विरोध केला होता, त्यावेळी भाजपाचे अनेक नेते तुरूंगातही गेले होते. आणीबाणीवरून भाजपासह अनेकांनी इंदिरा गांधींवर टीकेचा भडिमार केला होता, मात्र असे असतानाही सध्या भाजपात असलेल्या व मंत्रीपद भूषविणा-या मनेका गांधींना मात्र या सर्व गोष्टींबद्दल पूर्वकल्पना होती हे समोर आल्याने मनेका गांधी अडचणीत सापडू शकतात. 
पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री एस.एस.राय यांनी १९७५ सालच्या जानेवारी महिन्यातच इंदिरा गांधी यांना आणीबाणी जाहीर करण्याचा सल्ला दिल्ला होता. तत्कालीन राष्ट्रपती फखरूद्दीन अली अहमद यांची आणीबाणीच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यास हरकत नव्हती, त्यांनी त्यासाठी तत्काळ सहमती दर्शवल्याचेही धवन यांनी नमूद केले आहे. 
मात्र जाहीर करण्यात आलेली आणीबाणी इंदिरा यांची राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी लादण्यात आली नव्हती, उलट त्या स्वत:च राजीनामा देण्यास तयार होत्या असेही धवन यांनी स्पष्ट केले. १९७५ सालच्या जून महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांती निवड रद्द केल्याचा निर्णय ऐकल्यावरच त्यांनी आपला राजीनामा तयार करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे राजीनामा टाईप करून तयारही होता मात्र मंत्रीमंडळातील इतर सहका-यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा देण्यापासून रोखले आणि त्या राजीनाम्यावर त्यांनी स्वाक्षरी केली नाही, असे धवन यांनी म्हटले आहे.