शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

१८०० गावांचा बृहत् आराखडा तयार करा गावागावात जाऊन बैठका घ्या : पालकमंत्र्यांच्या कृषी विभागाला सूचना

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

नागपूर : येत्या ३० ऑगस्टपर्यंत जिल्‘ातील १८०० गावांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण चमूने जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या सूचनांसह कृषी विभागाचा गावनिहाय बृहत् आराखडा तयारा करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.

नागपूर : येत्या ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील १८०० गावांमध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण चमूने जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा. प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठकी घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या सूचनांसह कृषी विभागाचा गावनिहाय बृहत् आराखडा तयारा करावा अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कृषी विभागाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात झालेल्या खरीप हंगाम पूर्व आढावा सभा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत वरील सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
प्रत्येक गावात कृषी विभागाय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, संबंधित अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घेऊन या बैठका घ्याव्यात, यापूर्वीच्या झालेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली.
या आढावा बैठकीला आ. सुनील केदार, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे, आ. प्रकाश गजभिये, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे उपस्थित होते.
हवामान-वातावरण बदलानुसार पीक पध्दतीत बदल, उत्पादन वाढीबद्दल मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विभागाचे आहे. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचा एक ग्रुप तयार करावा व शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा. एका बैठकीत किमान २५० शेतकरी असले पाहिजेत. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चार महिन्याचा कार्यक्रम तयार करून या चमूला द्यावा व सूचनेची काटेकोर अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी केली.
फळबागा आणि ठिबक सिंचनाचे अनुदान अजून शेतकऱ्याला मिळाले नाही याकडे आमदार सुनील केदार यांनी लक्ष वेधले. यावर कृषी विभागाजवळ समाधानकारक उत्तर नव्हते. प्रत्येक तालुक्यात मागासवर्गीय शेतकरी किती, अनुसूचित जमातीचे शेतकरी किती, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक अशी यादी बनवावी. पीक पध्दतीनुसार पिकाचे नियोजन करुन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्या. जिल्ह्यातील प्रलंबित कृषिपंपाचे कनेक्शन जूनपयंर्त पूर्ण होतील, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.